महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जातीद्वेष !

मुंबई – समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते, असा खोटा इतिहास उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत आहेत. समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते; परंतु याविषयी जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे, असे ज्ञान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ६ जून या दिवशी गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत पाजळले.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती आणि धर्म यांच्या लोकांना समान स्थान होते. (‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे काँग्रेसवाले ! – संपादक) सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना राज्यघटनेत आहे. शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ म्हटले जाते; परंतु महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणार्या दुष्ट प्रवृत्तींचा सध्या महाराष्ट्रात नंगानाच चालू आहे. भाजपचे सरकार असतानांच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तींचा कडलोट करा. (जातीद्वेषी काँग्रेसचा कडेलोट व्हायची वेळ आली असूनही जातीयवादी विधान करत सुटलेले काँग्रेसवाले ! – संपादक)
संपादकीय भूमिकासमर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील पत्रव्यवहाराचे पुरावे आजही उपलब्ध आहेत आणि नवीन पुरावे नुकतेच कर्नाटकातही सापडले आहेत. हिंदूंना आतंकवादी ठरण्यासाठी षड्यंत्र रचणार्या काँग्रेसनेच छत्रपती शिवरायांच्या गुरूंविषयी बोलणे हाच मोठा विनोद होय ! |
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक