
बेंगळुरू (कर्नाटक) : राज्यातील कोप्पळ जिल्ह्यात एका बेकरीत झालेल्या हत्या प्रकरणाचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले आहे. यामध्ये चेनप्पा नरिनाल नावाच्या व्यक्तीला काही लोक कोयत्याने मारहाण करतांना दिसत आहेत. ही घटना ३१ मेच्या रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाणीत ३५ वर्षीय चेनप्पाचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहे की, चेनप्पा नरिनाल हा ओरडत बेकरीत शिरतो आणि त्याचा पाठलाग करणारे काही लोक त्याला मारण्यासाठी तेथे येतात. २ व्यक्ती कोयत्याने, तर एक व्यक्ती लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर प्रहार करत असल्याचे दिसत आहे. प्राण वाचवण्यासाठी बेकरीतून बाहेर पळाल्यावर अन्य दोघे-तिघे त्याला चाकूने भोसकतात.
या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून रवि, प्रदीप, मंजुनाथ, नागराज, गौतम, प्रमोद अशी त्यांची नावे आहेत. वैमनस्य आणि संपत्ती यांच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा ! |
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती