पुणे, २ जून (वार्ता.) – ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’ अशी संत तुकाराम महाराज यांनी महती वर्णन केलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी संजीवनी समाधी घेतली, असे तीर्थक्षेत्र केवळ वारकर्यांसाठीच नव्हे, तर भारतभूमीसाठी पवित्र आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी भारताच्या कानाकोपर्यातूनच नव्हे, तर जगभरातून भाविक आळंदी येथे येतात. अशा पवित्रक्षेत्राजवळ पशूवधगृह (कत्तलखाना) उभारण्याची दुर्बुद्धी प्रशासनाला सुचली आहे. येथील मोशी-डुडुळगाव सीमेवर ३.७८ एकर जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पशूवधगृहासाठी आरक्षित करण्याचे कुकर्म केले आहे. याविषयीचा सुधारित विकास आराखड्याचे प्रारूप पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने त्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून नुकतेच प्रसारित केले आहे.
१. मोशी येथील सर्वेक्षण क्रमांक ३२५ (आरक्षण क्रमांक ५/२२०) या जागेवर हे पशूवधगृह प्रस्तावित आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधीस्थानापासून ४ किलोमीटर परिसरात, तर इंद्रायणी नदीपासून अडीच किलोमीटर अंतरावर हे पशूवधगृह प्रस्तावित आहे.
२. हे पशूवधगृह समाधी स्थानापासून काही किलोमीटर अंतरावर आहे, अशी भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे; मात्र पशूवधगृह आरक्षित करण्यात आलेल्या परिसरात वारीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकर्यांच्या दिंड्या निवासाला थांबतात. वारीच्या कालावधीत लाखो वारकर्यांचा वावर या परिसरात असतो.
३. प्रशासन पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील अन्य भागांमध्ये पशूवधगृह उभारू शकते; मात्र आळंदी-देहू सारख्या पवित्र क्षेत्राजवळ पशूवधगृह उभारण्याचा हट्टहास प्रशासन का करत आहे ?, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात !
हा सुधारित विकास आराखडा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १५ मे या दिवशी संकेतस्थळावरून प्रसारित केला आहे. याविषयी महानगरपालिकेने नागरिकांच्या हरकती मागवल्या असून त्यासाठी ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या पशूवधगृहाला विरोध दर्शवण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेकडे अधिकाधिक हरकती नोंदवणे आवश्यक आहे.
वाचक, वारकरी आणि समस्त हिंदू धर्मप्रेमी यांना आवाहन !आळंदीसारख्या पवित्र ठिकाणी पशूवधगृह उभारण्याच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या निर्णयाविषयी आपल्या भावना दैनिक ‘सनातन प्रभात’ला अवश्य कळवा. ‘९२२५६३९१७०’ या भ्रमणभाष क्रमांकावर आपल्या प्रतिक्रिया पाठवाव्यात. |
आळंदी परिसरात पशूवधगृह होणार नाही, याची १०० टक्के निश्चिती देते ! – श्रीमती माधुरी मिसाळ, राज्यमंत्री
पशूवधगृहाविषयी स्थानिक आमदारांनी २-३ दिवसांपूर्वीच आमच्याकडे तक्रार केली आहे. ही तक्रार नगरविकास विभागाकडे पाठवली आहे. यावर आम्ही निश्चित कार्यवाही करू. आळंदी देवस्थानाच्या परिसरात पशूवधगृह होणार नाही, याची १०० टक्के निश्चिती मी तुम्हाला देते, अशी प्रतिक्रिया नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.
पशूवधगृहासाठीचे आरक्षण रहित केले नाही, तर रस्त्यावर उतरू ! – अधिवक्ता राजेंद्र उमाप, विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी
आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राजवळ पशूवधगृह बांधणे, ही खेदजनक घटना आहे. ही प्रशासनाची अक्षम्य चूक आहे. हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि राज्यमंत्री सौ. माधुरी मिसाळ यांच्या कानावर आम्ही घातला आहे. त्यांनी तात्काळ आरक्षण रहित करण्याचे आश्वासन दिले आहे. आरक्षण रहित झाले नाही, तर आमची रस्त्यावर उतरण्याची सिद्धता आहे. पशूवधगृहाचे आरक्षण पवित्र ठिकाणी असू नये, याची विशेष काळजी घेतली पाहिजे. हे आरक्षण तात्काळ रहित करावे.
हरकतींचा विचार करून योग्य निर्णय घेऊ ! – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृह आरक्षित करण्याच्या प्रकाराविषयी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. याविषयी शेखर सिंह म्हणाले, ‘‘नगरविकास आराखड्यामध्ये भूखंड आरक्षित करण्याचे काम एका संस्थेला देण्यात आले होते. आळंदी क्षेत्राजवळ पशूवधगृह आरक्षित करण्यात आल्याविषयी काही तक्रार आल्या आहेत. पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या आश्रमाजवळ हे पशूवधगृहाचे आरक्षण आहे. त्यांच्या आश्रमाकडूनही तक्रार आली आहे. या विकास आराखड्याविषयी आम्ही नागरिकांकडून हरकती मागवल्या आहेत. अनेक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. १५ जुलैपर्यंत हरकती स्वीकारण्याचा वेळ आहे. नागरिकांच्या सूचनांचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल.’’
संपादकीय भूमिका
|


बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !