ब्राझिलमधील जोनास मासेट्टी यांना वेदांच्या प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर उद्गार

नवी देहली – नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राजकीय, सामाजिक, कला, अध्यात्म, विज्ञान आदी क्षेत्रांतील मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात आले. साध्वी ऋतांबरा यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला, तसेच ब्राझिलमधील विश्व विद्या गुरुकुलचे संस्थापक जोनास मासेट्टी यांना वेद आणि भगवद्गीता यांच्या प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संदर्भात जोनास मासेट्टी म्हणाले की, मला हे अपेक्षित नव्हते. हा एक मोठा सन्मान आहे. ब्राझिलमध्ये बरेच लोक वेद शिकत आहेत. हा केवळ माझा सन्मान नाही, तर या परंपरेसाठी झटणार्या आमच्या कुटुंबासाठीही सन्मान आहे.
वेदांचा अभ्यास केल्यानंतर मासेट्टी यांनी ब्राझिलमधील रिओ डी जानेरो येथे विश्व विद्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेत त्यांनी वेद, संस्कृत, भगवद्गीता आणि ध्यान याचे अभ्यासक्रम चालू केले. मासेट्टी यांनी योग आणि वेद या विषयांवर पोर्तुगीज अन् इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक