डॉ. अधिवक्ता अरुण श्याम कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये वकिली करतात. त्यांनी कर्नाटकचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून न्यायालयीन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. देशभक्ती आणि धर्मनिष्ठा यांचा अद्भुत संगम असलेले डॉ. अधिवक्ता अरुण श्याम न्यायालयीन लढाईत हिंदुत्वनिष्ठांचा बुलंद आवाज बनले आहेत. जेव्हा निरपराध हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर खोटे आरोप लावले जातात आणि त्यांच्या कार्यक्रमांवर प्रतिबंध लावला जातो, तेव्हा ते नि:स्वार्थपणे न्यायालयात उभे राहून सत्याची लढाई लढतात. त्यांच्या कायदेशीर युक्तीवादामुळे अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना न्याय मिळाला आहे. ते कायद्याचा राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी वापर करतात. साहस, निर्भीडता आणि धर्मनिष्ठ असलेले डॉ. अधिवक्ता श्याम यांना ‘आधुनिक काळातील लोकमान्य टिळक’ म्हणता येईल. त्यांना गोवा येथे नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये ‘सनातन धर्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. डॉ. अधिवक्ता अरुण श्याम यांचा परिचय
डॉ. अधिवक्ता अरुण श्याम एम्. यांचा जन्म २१.३.१९८२ या दिवशी डी.के. जिल्ह्यात बंटवाल तालुक्यातील कोलनाडू गावातील पंजीगड्डे येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्याच गावातील अनुदानित कन्नड माध्यमाच्या प्राथमिक शाळेत झाले. श्रीराम विद्याकेंद्र कल्लाडका येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विठ्ठल ‘प्री-युनिव्हर्सिटी’ (विद्यापीठपूर्व शिक्षण) महाविद्यालयातून प्री-युनिव्हर्सिटी केली. त्यांनी मंगळुरू विद्यापिठाशी संलग्न असलेल्या पुट्टूर डी.के. येथील विवेकानंद विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. नंतर त्यांनी शिवमोग्गा येथील सी.बी.आर्. राष्ट्रीय विधी महाविद्यालयातून (कुवेम्पू विद्यापिठातून) पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी बेंगळुरू येथील ‘अलायन्स स्कूल ऑफ लॉ’मधून कायद्यातील ‘पीएच्.डी.’ केली. त्यांनी वर्ष २००४ मध्ये ‘कर्नाटक राज्य बार कौन्सिल, बेंगळुरू’ येथे प्रवेश घेतला आणि कायद्यात पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना शिवमोग्गा येथील ज्येष्ठ अधिवक्ता एम्.आर्. सत्यनारायण यांच्या चेंबरमध्ये ‘ट्रायल कोर्टा’ची वकिली चालू केली. वर्ष २००६ मध्ये ते भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता के.एम्. नटराज यांच्या चेंबरमध्ये सहभागी झाले. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालय, ट्रायल कोर्ट, कायदेशीर आणि तांत्रिक, कर्जवसुली न्यायाधिकरण इत्यादी संस्था, प्राधिकरण, न्यायाधिकरण अशा विविध ठिकाणी वकिली चालू केली. यासमवेतच ते अनेक प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित झाले. त्यांनी अनेक दिवाणी, फौजदारी, संवैधानिक, कॉर्पोरेट, कामगार, विमा, सेवा प्रकरणे, निवडणूक इत्यादी याचिका हाताळल्या आहेत. त्यांनी युक्तीवाद केलेल्या अनेक प्रकरणांची नोंद प्रतिष्ठित कायदा मासिकांमध्ये घेण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात अनेक लोकहितासाठी विनामूल्य कायदेशीर खटल्यांमध्ये ‘न्यायालय मित्र’ (ॲम्युक्स क्युरी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘राणी चेन्नम्मा विद्यापीठ’, ‘कॅम्पको’, ‘मलनाड अरेका मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.’, ‘बेंगळुरू विकास प्राधिकरण’ (बी.डी.ए.), ‘कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक मंडळ’, ‘बेंगळुरू महानगर परिवहन निगम’, ‘मंगळुरू विद्यापीठ’, ‘कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड’ इत्यादी प्रतिष्ठित संस्था आणि संघटना यांचे प्रतिनिधित्व केले आहे.
‘सनातन धर्मश्री पुरस्कार’

Adv. Aruna Shyam (@ShyamAruna), Former Addl. Advocate General, Karnataka High Court, was honoured with the prestigious #Sanatan_Dharmashri Award at #ShankhnadMahotsav 2025.
A fearless legal warrior, he has been a powerful voice for Hindus, defending innocent activists, and… pic.twitter.com/CQBWVDnZo4
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) May 19, 2025
समाजातील गरजू आणि कमकुवत घटकांना मोफत कायदेशीर साहाय्य देण्यासाठीही त्यांना ओळखले जाते. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीसाठी ‘पॅनेल अधिवक्ता’ म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयात त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीने आयोजित केलेल्या लोक-अदालतांमध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या खंडपिठाचे समन्वयक आणि सदस्य म्हणूनही काम केले आहे. त्यांनी वर्ष २०२० ते २०२३ या वर्षांसाठी कर्नाटक राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम केले आहे. त्यांना ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’च्या शैक्षणिक परिषदेचे सदस्य म्हणून नामांकन मिळाले आहे. ते काही संस्थांमध्ये मानद अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम करत आहेत. यासमवेतच त्यांनी ‘सार्वजनिक महत्त्वाचे कायदेशीर आणि वर्तमान समस्या’ यांवर लेख लिहून योगदान दिले आहे. कर्नाटकच्या माननीय उच्च न्यायालयाने त्यांना १४.१२.२०२१ या दिवशी ‘ज्येष्ठ अधिवक्ता’ म्हणून नियुक्त केले.
२. डॉ. अधिवक्ता अरुण श्याम यांनी हाताळलेले आणि हाताळत असलेले काही यशस्वी खटले
२ अ. अर्णव गोस्वामी यांच्या वतीने उच्च न्यायालयात यशस्वी प्रतिवाद
सौजन्य : रिपब्लिक वर्ल्ड यूट्यूब चॅनेल
तुर्कीयेमध्ये काँग्रेसचे आंतरराष्ट्रीय कार्यालय असल्याविषयी चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी भाजपचे ‘आयटी सेल’ प्रमुख अमित मालवीय आणि ‘रिपब्लिक टीव्ही’चे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले होते. याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने २२ मे या दिवशी स्थगिती दिली. या वेळी अर्णव गोस्वामी यांच्या वतीने न्यायालयात डॉ. अधिवक्ता अरुण श्याम यांनी काम पाहिले.
|
‘रिपब्लिक टीव्ही’चे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी डॉ. अधिवक्ता अरुण श्याम यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार !
|
२ आ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भट यांना दिलासा

श्रीरंगपट्टण येथे मुसलमान महिलांचा कथित अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कल्लाडका प्रभाकर भट यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्याला दिले. याप्रकरणी भट यांच्या वतीने डॉ. अधिवक्ता अरुण श्याम यांनी युक्तीवाद केला होता.
२ इ. स्वामी राघवेश्वर भारती यांच्या विरोधातील कथित बलात्कार प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाकडून रहित

गोकर्ण (कर्नाटक) येथील श्री रामचंद्रपुरा मठाचे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री राघवेश्वर भारती स्वामी यांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेले कथित बलात्काराचे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाने रहित केले. त्यांच्या कायदेशीर कार्यवाहीत डॉ. अधिवक्ता अरुण श्याम यांची महत्त्वाची भूमिका होती.
२ ई. हिंदु जागरण मंचच्या नेत्याच्या हद्दपारीला स्थगिती
हिंदु जागरण मंचच्या विटला तालुक्याचे सदस्य अक्षय राजपूत यांना निवडणुकीच्या आदल्या रात्री पोलिसांनी घरी जाऊन अटक केली, तसेच त्यांना हावेरी जिल्ह्यातून हद्दपार केले. याविरोधात अधिवक्ते अरुण श्याम यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेऊन हद्दपारीच्या आदेशावर स्थगिती आणली.
२ उ. गौरी लंकेश हत्याप्रकरणी एकूण १५ संशयितांना जामीन

वर्ष २०२४ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी एकूण १६ पैकी १५ जणांना कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन संमत केला. यासाठी न्यायालयात डॉ. अधिवक्ता अरुण श्याम आणि अन्य अधिवक्ते यांनी यशस्वी प्रतिवाद केला.

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र