लातूर – विनम्रता, भाव आणि शिकण्याची तळमळ असलेले लातूर येथील सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. विजय गिरीशराव सहदेव (वय ५८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, अशी आनंदवार्ता सनातनच्या ११२ व्या समष्टी संत पू. दीपाली मतकर यांनी एका सत्संगात दिली. २५ मे २०२५ या दिवशी लातूर येथील साधकांसमवेत एका अनौपचारिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पू. दीपाली मतकर यांनी श्री. विजय सहदेव यांचा श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार केला. ही आनंदवार्ता ऐकून सर्व साधकांचा आनंद द्विगुणीत झाला होता. या वेळी श्री. विजय सहदेव म्हणाले, ‘‘मी यापूर्वी श्री वेदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होतो. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने मला एकमुखी दत्तगुरूंचे दर्शन झाले. या जन्मात मला जेव्हा साधना समजली, तेव्हा खर्या अर्थाने माझा जन्म झाला, असे वाटले. आयुष्याचे संपूर्ण सार केवळ साधनेतच आहे.’’
या वेळी पू. दीपाली मतकर म्हणाल्या, ‘‘व्यवहार सांभाळत आध्यात्मिक प्रगती कशी करू शकतो ?’ हे श्री. विजय सहदेव यांच्याकडून शिकता येते. त्यांच्यातील विनम्रता आणि भाव यांमुळे ते आध्यात्मिक प्रगती करू शकले. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे, प्रत्येकात गुरुरूप पहाणे या त्यांच्यातील गुणांमुळे त्यांच्याशी बोलणार्या प्रत्येकाला आनंद जाणवतो.’’

स्वतः भावावस्थेत राहून इतरांचाही भाव जागृत करण्याची क्षमता असलेले श्री. विजय सहदेव !

१. नम्र
‘श्री. सहदेव हे वास्तूविशारद आहेत, तसेच ते एका प्राथमिक शाळेचे संचालक आहेत. प्रतिष्ठित असूनही ते पुष्कळ नम्र आहेत.
२. ते गरजू लोकांना साहाय्य करतात.
३. सेवेची तळमळ
अ. आम्ही त्यांना सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे सात्त्विक चित्र दाखवले. तेव्हा त्यांनी ते लगेच हातांत घेतले आणि सांगितले, ‘‘यात किती सामर्थ्य आहे ! हे चित्र गुरुदेवांनी सिद्ध करून दिले आहे. याचा लाभ सर्वांना होण्यासाठी मला ५० चित्रे द्या.’’ त्यांनी काही कर्मचार्यांना कार्यालयात बोलावले आणि ‘या चित्राकडे बघून काय वाटते ? ‘श्रीकृष्ण प्रत्यक्ष आहे’, असे जाणवते ना ?’, असे विचारले. हे बोलतांना त्यांचा भाव जागृत होत होता.
आ. ते एका प्राथमिक शाळेचे संचालक आहेत. ‘शाळेतील मुलांना धर्मशिक्षण मिळावे’, यासाठी ते सनातनचे सर्व ग्रंथ घेतात आणि ग्रंथांचा अभ्यासही करतात.
४. भाव
अ. सनातनचे साधक त्यांच्याकडे गेल्यावर ‘गुरुदेवच आले आहेत’, असा त्यांचा भाव असतो.
आ. श्री. सहदेव यांच्या सहवासात आपलाही भाव जागृत होतो, तसेच मनाची सकारात्मकता वाढते.’
– (पू.) दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत, वय ३६ वर्षे), सोलापूर (२३.४.२०२५)
नम्र, प्रेमळ आणि संतांप्रती भाव असणारे श्री. विजय सहदेव !

१. सौ. सुवर्णा मिरजकर, लातूर
१ अ. ‘श्री. विजय सहदेव यांच्या मनात आई-वडिलांविषयी पुष्कळ आदरभाव आहे.
१ आ. भाव
१. प्रत्येक महिलेशी बोलतांना ‘श्री लक्ष्मीदेवीशीच बोलत आहे’, असा त्यांचा भाव असतो.
२. त्यांना खाण्या-पिण्याची आवड नाही. ‘जे अन्न ताटात येईल, तो भगवंताचा प्रसाद आहे’, या भावाने ते ग्रहण करतात.
३. एकदा त्यांच्या आईला श्री संतोषीमातेची मूर्ती भेट म्हणून मिळाली होती. घरातील अडचणींमुळे श्री. सहदेव यांना त्या मूर्तीची नियमित पूजा करणे शक्य होत नव्हते; म्हणून त्यांनी एका पुजारी कुटुंबाला ती मूर्ती देण्याचे ठरवले. ते कुटुंब ती मूर्ती घेण्यास श्री. सहदेव यांच्या घरी आले होते. तेव्हा समवेत त्यांची छोटी मुलगीही होती. ‘माझ्या घरी जगदंबाच आली आहे’, असे म्हणून श्री. सहदेव यांनी स्वतः त्या मुलीच्या हातावर मेहंदी काढली, कपडे घेण्यासाठी पैसे दिले आणि तिला भावपूर्ण नमस्कार केला. ते पाहून पुजारी कुटुंबाचाही भाव जागृत झाला.’
२. सौ. स्नेहल उजनीकर, लातूर
अ. ‘ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात.
आ. त्यांच्या सहवासात चांगले वाटते.
इ. ‘माझ्याकडे जे काही आहे, ती गुरुदेव आणि आई-वडील यांची कृपा आहे’, असे ते सांगतात.’
३. श्री. हिरालाल तिवारी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), सोलापूर
३ अ. प्रेमभाव : ‘श्री. सहदेव यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. साधक त्यांच्याकडे गेल्यावर ‘कोणी संत भेटायला आले आहेत’, असे वाटून त्यांना आनंद होतो. त्या आदराने आणि प्रेमाने ते साधकांशी बोलतात.
३ आ. संतांप्रती भाव : सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु स्वाती खाडये) आणि पू. दीपालीताई (पू. दीपाली मतकर) या श्री. सहदेव यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी श्री. सहदेव यांनी मंत्रोच्चार करत त्यांचे स्वागत केले. त्या वेळी त्यांचा भाव जागृत झाला होता.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २३.४.२०२५)
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ