पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर यांची पाकच्या संसदेत सरकारला विनवणी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर आपण आताच पाणी संकट सोडवले नाही, तर आपण उपासमारीने मरू शकतो. हा ‘वॉटर बाँब’ (पाण्याचा बाँब) आहे; कारण सिंधु खोरे ही आपली जीवनरेखा (लाइफ लाइन) आहे.
https://twitter.com/SanatanPrabhat/status/1926325117157519677
आपल्या देशात तीन चतुर्थांश पाणी देशाबाहेरून येते. आपल्यातील प्रत्येक १० पैकी ९ लोक या नदीवर अवलंबून आहेत. आपल्या ९० टक्के पिकांना या नदीतून पाणी मिळते. या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी सरकारने काही पावले उचलावीत, अशी मागणी पाकिस्तानचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधु जल वाटप करार भारताने स्थगित केल्यावरून पाकच्या संसदेत केली. अली जफर माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे खासदार आहेत.
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !