विश्वरूपे घडवले मूळ रूप दर्शन । त्यारूपे दाखवले तू आहेस ‘सनातन’ ।।
१. नयनमनोहर श्रीकृष्णाचे तेजस्वी विश्वरूपदर्शन अर्जुनाला सहन न होणे
भगवान श्रीकृष्णाचे रूप नयनमनोहर आहे. त्याचे बाळकृष्ण रूप तर आणखी सुंदर आहे; मात्र त्याच श्रीकृष्णाने मनुष्यरूपात असतांना जेव्हा त्याचे विश्वरूप प्रकट केले, तेव्हा काही क्षणांनंतर अर्जुनाला ते सहन झाले नाही. श्रीकृष्णाचे विश्वरूपदर्शन अपरिमित तेजस्वी होते.
२. श्रीकृष्णाचे विश्वरूपदर्शन होण्याची वेळ समीप आली आहे !
ज्याच्या पाच बोटांवर सदैव पंचमहाभूते स्थित असतात, ‘जल (क्षीरसागर)’ हे ज्याचे निवासस्थान आहे, ‘अग्नि’ हे ज्याचे शरीर आहे, ज्याचा प्रत्येक रोम (शरिरावरील छिद्र) म्हणजे ‘देवता, ॠषी आणि दैवीगण’ आहेत, ज्याचा क्रोध म्हणजे ‘सूर्य’ आहे, ज्याची शांतता म्हणजे ‘चंद्र’ आहे, ज्याचे दोन कान म्हणजे ‘अश्विनीकुमार’ आहेत, ज्याचा श्वास ‘वायू’ आहे, ज्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ‘योगमाया, कुबेर, यम’ आदी देवता सदैव तत्पर आहेत, ज्याच्या डोळ्यांची पापणी मिटणे म्हणजे ‘रात्र’ आणि पापणी उघडणे म्हणजे ‘दिवस’ आहे, ज्याचे आर्ततेने केलेले नामस्मरण संकटनाशक आहे, ज्याचे स्मरण म्हणजे ‘आनंदप्राप्ती’ अन् विस्मरण म्हणजे ‘दुःख’ आहे, अशा भगवान श्रीकृष्णाचे विश्वरूपदर्शन निसर्ग आणि युद्ध यांच्या माध्यमांतून प्रकट होण्याची वेळ आलेली आहे.
३. शंखनाद महोत्सवरूपी रथावर सनातन राष्ट्राच्या ध्वजाचे आरोहण !
‘महोत्सवाद्वारे युद्धाचा शंखनाद होणे आणि शंखनाद महोत्सवरूपी रथावर सनातन राष्ट्राच्या ध्वजाचे आरोहण होणे’, हे श्रीकृष्णाच्या विश्वरूपदर्शनाची वेळ जवळ आली आहे, याचे संकेत आहेत.

अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !