National Herald Case : सोनिया आणि राहुल गांधी यांनी आर्थिक घोटाळा करून १४२ कोटी रुपये कमावले

नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचा न्यायालयात दावा

सोनिया आणि राहुल गांधी

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) येथील न्यायालयात माहिती देतांना सांगितले की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात आर्थिक घोटाळे करून १४२ कोटी रुपये कमावले. त्यामुळे या दोघांच्या विरोधात आर्थिक अफरातफर केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ आरोपी आहेत. सॅम पित्रोदा, सुमन दुबे, यंग इंडियन, डोटेक्स मर्चेंडाईज प्रा.लि. आणि सुनील भंडारी हे या प्रकरणात सहआरोपी आहेत.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस्.व्ही. राजू यांनी म्हटले की, वर्ष २०२३ मध्ये ईडीने ‘नॅशनल हेराल्ड’शी संबंधित ७५१ कोटी ९० लाख रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली, तेव्हापासून सोनिया गांधी आणि राहुल गांधी आर्थिक अफरातफरीतून मिळालेल्या पैशांचा लाभ घेत आहेत.