उत्तराखंड मदरसा बोर्डाचा निर्णय
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड मदरसा बोर्डाने निर्णय घेतला आहे की, राज्यातील सर्व मदरशांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ शिकवले जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना देशाच्या सैन्याचे शौर्य आणि बलीदान समजेल. उत्तराखंड मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून काझमी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर या निर्णयाची माहिती दिली.
Big news from Uttarakhand! 🇮🇳
'#OperationSindoor' is set to be taught in madrassas.
A commendable move to counter anti-India narratives. 🤔
The key challenge now: ensuring effective implementation & genuine acceptance from students & teachers. #Uttarakhand #Nationalism pic.twitter.com/Q3AvPaUM9Y
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 20, 2025
काझमी म्हणाले की,
१. उत्तराखंड ही विरांची भूमी आहे आणि येथील मुलांमध्येही देशभक्तीची भावना आहे. आम्हाला असे वाटते की, मदरशांच्या मुलांनीही सैन्याच्या शौर्य आणि बलीदान यांच्या कथांपासून प्रेरणा घ्यावी. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचे एक उदाहरण आहे.
२. उत्तराखंडमध्ये एकूण ४५१ मान्यताप्राप्त मदरसे आहेत, ज्यामध्ये सुमारे ५० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेतात. येत्या काळात या सर्व संस्थांमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित एक प्रकरण नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल. यासाठी एक विशेष अभ्यासक्रम समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये शिक्षणतज्ञ, इतिहासकार आणि मदरसा शिक्षण तज्ञांचा समावेश असेल. हा विषय कोणत्या वर्गात, कसा आणि किती खोलीत शिकवायचा हे समिती ठरवेल.
३. हा निर्णय राजकीय नसून शैक्षणिक आणि राष्ट्रवादी भावनांनी प्रेरित आहे. मुलांना केवळ धार्मिक शिक्षणाबद्दलच नव्हे, तर देशाचा इतिहास, संस्कृती आणि त्याविषयीचा समर्पणभाव यांविषयीही जागरूक करणे महत्त्वाचे आहे.
संपादकीय भूमिकामान्यताप्राप्त असो किंवा नसो, भारतातील अनेक मदरसे हे भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी कारवायांचे अड्डे आहेत. त्यामुळे असा अभ्यासक्रम मुलांना शिकवण्याचा स्तुत्य निर्णय घेतला, तरी त्याची कार्यवाही किती प्रमाणात होईल, तसेच त्याला मदसांमधील मुले आणि शिक्षक यांच्याकडून किती प्रतिसाद मिळेल, हे पहावे लागेल ! |

जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू