सनातन राष्ट्र शंखनाद । 

हिंदूंनो, गर्जा द्या साद ।
‘सनातन राष्ट्र शंखनाद’ ।। धृ. ।।

या स्वर्णभूमीची गौरवगाथा ।
इतिहासाच्या पानोपानी ।।
कालौघात शिथिलला धर्म ।
कष्टी भूमी ही वर्तमानी ।। १ ।।

सुश्री सुप्रिया नवरंगे

सुराज्यास्तव आला धावून ।
देव कृपाळू श्री नारायण ।।
पुण्यात्म्यांची आर्त हाक अन् ।
श्रीविष्णूचा प्रतिसाद ।। २ ।।

सनातन राष्ट्र शंखनाद । सनातन राष्ट्र शंखनाद ।।
धर्म आपुला पाया बळकट ।
गुरुकृपेची अभेद्य चौकट ।।
ईशपरायण शासनकर्ते ।
मांडती ईशराज्याचा पट ।। ३ ।।

राजाचे पद प्रजा अनुसरी ।
धर्मवृत्तीने सर्व कर्म करी ।।
संत बुडविती घोर पाखंड ।
जगी हो आनंदी आनंद ।। ४ ।।

देई राष्ट्रास विश्वगुरुपद । सनातन राष्ट्र शंखनाद ।।

– सुश्री सुप्रिया नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.३.२०२५)