‘५.६.२०२६ या दिवशी कु. चांदणी आसोलकर (भरतनाट्यम् विशारद, गोवा, वय ३१ वर्षे) हिचे निधन झाले. ती मडगाव, गोवा येथील सनातनच्या साधिका श्रीमती शुभांगी चंद्रकांत आसोलकर यांची मुलगी होती. तिची आणि माझी ओळख अनुमाने दीड वर्षापूर्वी गोवा येथील वर्ष २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी नृत्य सेवेच्या अनुषंगाने झाली. मी महोत्सवात नृत्य बसवण्याची सेवा करत होते. तेव्हा नृत्याची जाणकार साधिका, म्हणून माझी चांदणीशी ओळख झाली. ती ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या नृत्यसेवेत सहभागी झाली होती. १६.६.२०२६ या दिवशी तिच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त मला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सकारात्मक राहून शारीरिक स्थितीला सामोरे जाणे आणि इतर गंभीर रुग्णांनाही सकारात्मक रहाण्यास साहाय्य करणे
‘कु. चांदणीची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. तिला डायलिसिस (टीप) करावे लागत असे. तिने स्वतः ‘नृत्य विशारद’ ही पदवी घेतलेली होती, म्हणजेच नृत्य क्षेत्रातील ती उच्चविद्याविभूषित होती. तिला मूत्रपिंडाचा गंभीर आजार असतांनाही ती भरतनाट्यम् शिकली. ती अनुमाने ८ ते १० वर्षांपासून इतरांनाही भरतनाट्यम् शिकवत असे. एवढेच नव्हे, तर समाजातील जे गंभीर रुग्ण होते, अशा व्यक्तींनाही ती ‘सकारात्मक कसे रहायचे ?’ याविषयी सांगत असे.
टीप : टीप १ – ‘मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया !’

२. नम्रता आणि स्वीकारण्याची वृत्ती
चांदणीला नृत्य क्षेत्रातील शिक्षणाचा आणि शिकवण्याचा अनुभव होता. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी नृत्य बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये ‘मला पुष्कळ कळते किंवा मी सांगीन तसे झाले पाहिजे’, असा तिचा मुळीच विचार नसे. तिने एखादी मुद्रा सुचवल्यावर ‘तीच मुद्रा करावी’, असा तिचा कधीही अट्टहास नव्हता. ‘तुम्ही सांगाल’ तसे मी नृत्य करण्याचा प्रयत्न करीन’, अशी अत्यंत नम्र आणि स्वीकारण्याची तिची भूमिका होती.
३. अपेक्षा नसणे
चांदणी चांगली नृत्यांगना असूनही कोणत्याही भूमिकेसाठी ती सिद्ध असे. ‘मला महत्त्वाची भूमिका मिळायला हवी किंवा पुढच्या रांगेतच मी असायला हवे’, अशी तिची अपेक्षा नसायची.
४. गंभीर शारीरिक स्थिती स्वीकारून आनंदी रहाणे
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी नृत्याचा सराव करण्यासाठी ती अनेकदा डायलिसिसची प्रक्रिया संपवून रुग्णालयातून थेट नृत्याच्या सरावाला येत असे; मात्र ती कठीण परिस्थितीतून जात आहे’, असे तिने कधीही सांगितले नाही. ‘एखादी गंभीर शारीरिक स्थिती असतांनाही व्यक्ती किती आनंदी आणि सकारात्मक राहू शकते !’, याचे चांदणी एक आदर्श उदाहरण होती.
५. सेवेची तळमळ
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी आम्हाला काही साहित्य विकत घ्यायचे होते. त्या वेळी काही साधिकांना मी निरनिराळ्या ठिकाणी विचारण्यास सांगितले होते. त्या वेळी चांदणीला बरे नसतांनाही तिने ही सेवा करण्याची सिद्धता दर्शवली आणि ती सेवा तळमळीने पूर्णही केली.
६. वर्ष २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’नंतर चांदणी नामजपादी उपाय करत होती आणि संगीताच्या संदर्भातील शिबिर अन् सत्संग यांमध्ये ती सहभागी होत होती.
७. नृत्यकलेप्रती समर्पणभाव
चांदणी चांगली नर्तिका होती. तिला तीव्र शारीरिक त्रास असूनही नृत्य करतांना तिने कधीही सवलत घेतली नाही, म्हणजे नृत्यातील वैशिष्ट्यपूर्ण हालचाली करतांना जेवढी ऊर्जा लागते, तेवढी ऊर्जा ती वापरत असे. यातून नृत्यकलेविषयीचा तिचा समर्पणभाव माझ्या लक्षात आला.
८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या नृत्यांमध्ये तिला सहभागी होता आले’, ही तिच्यावर असलेली गुरुकृपा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा) आहे’, असे ती सांगत असे. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मी नृत्य करू शकते’, असे ती सतत म्हणत असे.
माझी आणि चांदणीची ओळख होऊन केवळ दीड वर्ष झाले होते, तरीही आमच्यात जवळीक निर्माण झाली होती. तिच्यातील गुणांमुळेच ती सदैव माझ्या लक्षात राहील.’
– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०२६)
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी