
१. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी अनुष्ठान केल्यानंतर पूजेतील संस्कारित साहित्य नदीमध्ये विसर्जन करण्यास सांगणे
‘वर्ष २०१५ मध्ये मी नाशिक येथे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या सेवेत होतो. तेव्हा एकदा योगतज्ञ दादाजी यांनी प.पू. डॉक्टरांसाठी आणि स्वत:साठी एक अनुष्ठान केले होते. अनुष्ठान झाल्यानंतर पूजेतील संस्कारित साहित्य विसर्जन करण्यासाठी त्यांनी मला एका साधकाच्या समवेत नाशिक येथील गोदावरी नदीच्या ठिकाणी जायला सांगितले. त्यांनी मला संस्कारित साहित्य विसर्जन करण्यापूर्वी ‘ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।। ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ।।’ ही सांप्रदायिक प्रार्थना ५ वेळा म्हणून ते साहित्य नदीच्या पाण्यामध्ये विसर्जन करण्यास सांगितले.
२. संस्कारित साहित्य नदीमध्ये विसर्जन करण्यापूर्वी प्रार्थना म्हणत असल्यापासून पूजासाहित्य नदीत विसर्जन करीपर्यंत ७ तेजस्वी गोल आकाराचे गोळे दिसणे आणि त्या देवता असल्याचे जाणवणे

मी डोळे बंद करून प्रार्थना म्हणत असतांना मला लख्ख प्रकाशरूपी ७ तेजस्वी गोल आकाराचे गोळे दिसले. मी प्रार्थना करून पूजेतील साहित्याचा डबा नदीच्या पाण्यात विसर्जन करीपर्यंत मला ते प्रकाशरूपी गोळे दिसत होते. मी डबा पाण्यात विसर्जन केल्यानंतर मला ते गोळे दिसणे बंद झाले. तेव्हा मला वाटले, ‘प्रत्यक्ष देवताच आल्या असाव्यात.’ त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला.
३. योगतज्ञ दादाजींना अनुभूतीविषयी सांगितल्यावर त्यांनी ‘त्या शक्तिदेवता होत्या’, असे सांगणे

संस्कारित साहित्य विसर्जन करून योगतज्ञ दादाजींकडे आल्यानंतर त्यांना मी घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू भाग्यवान आहेस. तुला दिसलेले गोळे, म्हणजे शक्तिदेवता होत्या. संस्कारित पूजासाहित्य विसर्जन करायला गेल्यानंतर ‘शक्तीदेवता दिसल्या’, असे आजपर्यंत मला कुणी सांगितले नाही. संस्कारित पूजासाहित्य विसर्जन करत असतांना तेथे सूक्ष्मातून देवता उपस्थित असतात.’’
‘योगतज्ञ दादाजी यांच्या कृपेमुळे मला देवतांचे दर्शन झाले’, त्याबद्दल मला कृतज्ञता वाटली.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२५)
पू. शरदकाका यांचा संदेश !

‘प.पू. डॉ. आठवले यांना ८३ व्या जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा आणि साष्टांग नमस्कार. ‘प.पू. डॉक्टर यांचे आयुरारोग्य चांगले रहावे’, यासाठी योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– (पू.) शरद वैशंपायन, कल्याण, जि. ठाणे.
|
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !