पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथील त्राल भागात सुरक्षादलांसमवेत झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले. येथे सुरक्षादलांकडून शोध मोहीम राबवली जात असतांना ही चकमक उडाली. ठार झालेले ३ आतंकवादी हे हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेचे आहे. त्यांची ओळख अजून पटलेली नाही.
१. गुप्तचर यंत्रणांनी आतंकवाद्यांचा ठावठिकाणा कळवल्यावर भारतीय सैन्य, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या सैनिकांनी संयुक्तपणे आतंकवाद्यांच्या विरोधात मोहीम राबवली.
२. आतंकवाद्यांना शोधण्यासाठी गेल्यावर त्यांनी सैनिकांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. त्यानंतर सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आतंकवादी ठार झाले .
३. तीन दिवसांपूर्वी शोपिया येथे आतंकवाद्यांशी उडालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचे ३ आतंकवादी ठार झाले होते.
संपादकीय भूमिकाकाश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकमधील आतंकवाद्यांचे कारखाने आणि ती चालवणारे पाकचे सैन्य यांना नष्ट करणे आवश्यक आहे ! पाकमध्ये आतंकवाद्यांची अनेक तळे असून त्यांपैकी केवळ ९ तळांवर भारताने आक्रमण करून ती नष्ट केली असल्याने आतंकवाद संपलेला नाही ! |

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani