‘वाराणसी येथील श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा जन्म ९ डिसेंबर १९५८ या दिवशी रामनगर, काशी येथे झाला. ज्योतिषशास्त्र क्षेत्रात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. ते वेद, कृष्ण यजुर्वेद, तैित्तरीय शाखा, शुक्ल यजुर्वेद-शतपथ ब्राह्मण, वेदांग, न्यायादीदर्शन, पुराण, इतिहास, राजशास्त्र, धर्मशास्त्र, काव्य कोश, ज्योतिष, तंत्रगम, श्रौत यांतील विद्वान समजले जातात. ते ग्रह, नक्षत्र आणि चौघडिया या विषयांतील तज्ञांपैकी एक असल्याने ते अशा दुर्मिळ विद्वानांमध्ये गणले जातात, ज्यांच्याकडे गुंतागुंतीच्या आणि समस्यायुक्त मुहूर्तांवर उपाय शोधण्याची क्षमता आहे. ते ‘जगद्गुरु रामानंदाचार्य पुरस्कारा’ने सन्मानित आहेत. काशीतील पंचगंगा घाट स्थित रामानंद पंथाचे एकमेव आचार्य पीठ असलेल्या ‘श्रीमठा’चे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामनरेशाचार्य म्हणतात, ‘श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा सन्मान म्हणजे भारताच्या शाश्वत वैदिक परंपरेचा सन्मान आहे.’

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. विद्वतेचा वडिलोपार्जित वारसा
श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांचे कुटुंब काशीमध्ये रहात आहे. असे म्हटले जाते की, ते मूळचे दक्षिण भारतीय आहेत. त्यांचे पूर्वज दक्षिण भारतातून काशीला आले होते. त्यांचे वडील राजराजेश्वर शास्त्री द्रविड यांना ‘पंडितराज’ पदवी मिळाली होती. भारतशासनाने त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केले होते. तीच परंपरा पुढे नेणारे श्री. गणेश्वर शास्त्री हे वेद-पुराण यांच्यासह अनेक धर्मग्रंथांचे अभ्यासक आहेत. त्यांचे भाऊ पंडित विश्वेश्वर शास्त्री हेही मोठे विद्वान आहेत.
२. गणेश्वर शास्त्री द्रविड यांचे कार्य
देशातील महान विद्वानांपैकीे श्री. गणेश्वर शास्त्री आहेत. ते शास्त्रीय साधनेसाठी देशभरात ओळखले जातात. धर्मप्रचारार्थ ते भारतभर भ्रमण करतात. काशीतील विद्यार्थ्यांना शिकवतात. सध्या ते रामघाट येथील श्री वल्लभराम शालिग्राम साङ्वेद विद्यालयाचे संचालक आहेत. तेथे मुलांना आचार्य बनण्याचे आणि धार्मिक विधींचे शिक्षण देतात. ‘गीर्वाणवाग्वर्धिनी सभेत’ त्यांचा ‘न्यायाधीश’ म्हणून आदर केला जातो. ते सामान्यांना ज्योतिष, आयुर्वेद आणि कर्मकांड यांत निःस्वार्थपणे मार्गदर्शन करतात. वडिलांच्या शिकवणीनुसार विद्याव्रताचे पालन करून त्यांनी असंख्य लोकांना शिक्षण दिले आहे. दक्षिण भारतातून येथे आल्यानंतर त्यांच्या पणजोबांनी चालू केलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना वैदिक शास्त्रे, विधी आणि यज्ञाच्या पद्धती शिकवल्या जातात. हे विद्यार्थी शास्त्री आणि आचार्य बनून प्राचीन संस्कृत भाषा अन् त्यात लिहिलेले विविध धर्मग्रंथ यांचे जतन करत आहेत. त्यांनी त्यांचे आयुष्य वेदांचा अभ्यास, यज्ञांचे आयोजन आणि सनातन परंपरेची सेवा करणे यांसाठी समर्पित केले आहे. त्यांची विद्वत्ता, साधना आणि सांस्कृतिक योगदान यांमुळे त्यांना काशीतच नव्हे, तर भारतात विशेष स्थान आहे.
रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट !

श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी ६ जून २०२४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी आश्रमातील कार्य श्रद्धेने जाणून घेऊन कार्याला आशीर्वाद दिले. त्यांनी साधकांना संदेश दिला, ‘बोलणे मधुर असणे, दया दाखवणे, दान करणे, गरिबांचे रक्षण करणे आणि सत्संगात रहाणे’, या ५ गोष्टी प्रत्येकाने आचरणात आणल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्यातील दोष दूर होऊन आपल्या अंगी चांगले गुण येतील आणि हिंदुत्वाची प्रतिष्ठापना होईल.’
४. तपस्वी ऋषींसारखी आदर्श जीवनशैली
ते अनवाणी राहून यम-नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. ते अजूनही तपस्वीसारखे जीवन जगतात. त्यांचे जीवन आदर्श ऋषींच्या परंपरेचे जिवंत उदाहरण आहे. ते राष्ट्रपती भवनामध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोचले, तेव्हा ते त्यांनी कपाळी चंदनाचा त्रिपुंड धारण केला होता, त्यांनी धोतर नेसून डाव्या खांद्यावर उपरणे घेतले होते. काशीच्या परम पवित्र भूमीच्या सन्मानार्थ त्यांनी तेथे कधी चप्पल किंवा जोडे घातले नाहीत. राष्ट्रपती भवनात ते अनवाणी उपस्थित होते. ज्योतिषशास्त्रात विशेष काम करणे, सांस्कृतिक वारसा जपणे आणि विद्यादान करणे यांसाठी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला.
५. गणेश्वर शास्त्रींनी काढलेले विशेष शुभ मुहूर्त

त्यांनी काशी विश्वनाथ धामचे भूमीपूजन आणि लोकार्पण यांचे शुभ मुहूर्त काढले. त्यांनी अयोध्येत श्रीराममंदिराच्या पायाभरणीसाठी सर्वांत दुर्मिळ ३२ सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त आणि श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वोत्तम ८४ सेकंदांचा मुहूर्त शोधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०२४ मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्याचा मुहूर्तही श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढून दिला होता.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !