विरोधी राजकीय पक्षांचा आक्षेप : आंदोलन करण्याची चेतावणी

पणजी, १३ मे (वार्ता.) – केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर १२ मे दिवशी गोव्यात आले असता त्यांनी गोव्याचा स्वतःचा वीजनिर्मिती प्रकल्प नसल्याने येथे सौर किंवा जलविद्युत् प्रकल्प उभारण्यास वाव नसल्याने आण्विक वीज प्रकल्पाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले होते. या प्रस्तावीत अणूऊर्जा प्रकल्पाला काँग्रेस आप रिव्हॉल्युशनरी गोवन्स आदी सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी १२ मेच्या रात्रीच एक पत्रक काढून प्रकल्पाला विरोध दर्शवला. ते म्हणाले, ‘‘गोवा हा भाजपच्या धोकादायक प्रयोगांसाठी ‘डंपिंग ग्राऊंड’ (कचरा टाकण्याचे मैदान) नाही. आम्ही केंद्र सरकारला गोव्याच्या भविष्याशी खेळू देणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरू.’’
आपचे(आम आदमी पक्षाचे) आमदार अमित पालेकर यांनी म्हटले आहे की, शेजारी कारवारमध्ये कैगा येथे अणूऊर्जा प्रकल्प अस्तित्वात असतांना गोव्यात या प्रकल्पाची काय आवश्यकता ? भाजप सरकार गोवा नष्ट करायला निघाले आहे का ? या प्रकल्पाला प्राणपणाने विरोध करू. गोव्यात आधीच भूमीचा तुटवडा आहे. आता जी काही भूमी शिल्लक आहे, तीही नष्ट करण्याचा सरकारचा विचार आहे का ?
रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब म्हणाले, ‘‘कर्नाटकला पाणी, देहलीकरांना गोव्याच्या भूमी आणि अणूऊर्जा प्रकल्पासाठी गोव्याची हवा देणे, हा भाजप सरकारचा विकास आराखडा आहे का ?’’
गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘केंद्रीय ऊर्जामंत्री खट्टर यांनी ही घोषणा कोणताही विचार न करता केली आहे. हा प्रकल्प झाल्यास आरोग्य आणि पर्यावरण यांचा प्रश्न निर्माण होईल.’’
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !