Michael Rubin Supports Operation Sindoor :अमेरिकेने पाकला ‘आतंकवादाचे केंद्र’ घोषित करावे ! 

अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांची मागणी 

अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन

नवी देहली – अमेरिकेने ‘लष्कर-ए-तोयबा’ला ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले होते; परंतु आम्ही पाकिस्तानला ‘आतंकवादाला निधी देणारा देश’ घोषित केलेले नाही. आता ‘ऑक्टोपस’च्या हातांऐवजी त्याच्या डोक्यावर आक्रमण करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेने एकमताने भारताला पाठिंबा द्यावा आणि पाकिस्तानला ‘आतंकवादाचे केंद्र’ घोषित करावे, अशी मागणी अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय ‘पेंटगॉन’चे माजी वरिष्ठ अधिकारी मायकेल रुबिन यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन करतांना केली आहे.

रुबिन पुढे म्हणाले की, 

१. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी ‘पाकिस्तानमध्ये हिंदु आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत’, असे विधान केल्यानंतर हा संघर्ष चालू झाला. तथापि भारतात हिंदु आणि मुसलमान दोघेही  एकत्र रहात आहेत. पाकिस्तानमध्ये हे घडत नाही; कारण पाकिस्तान तेथील अल्पसंख्यांकांना पद्धतशीरपणे देशातून हाकलून लावत आहे.

२. जेव्हा पाकिस्तान आर्थिक किंवा सामाजिक पातळीवर अपयशी ठरतो, तेव्हा तो भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. हे एका अपयशी राष्ट्राचे लक्षण आहे.

३. पाकिस्तान आता चांगलाच अडकला असून आता तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आह इतरांसाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दिवस आपणच पडतो’, हे असीम मुनीर यांनी लक्षात ठेवावे आणि इतरांसाठी खड्डा खोदणे थांबवावे.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानला शस्त्रनिर्यात करून पैसा कमावणारी धूर्त अमेरिका असे कधीही करणार नाही, हेही तितकेच सत्य !