Zameer Ahmad Khan : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर सर्व मशिदींमध्ये प्रार्थना करावी !

जमीर अहमद खान, मंत्री, कर्नाटक

जमीर अहमद खान

बेंगळुरू – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर मशिदींमध्ये विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन कर्नाटकचे वक्फ आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री जमीर अहमद खान यांनी केले आहे. या अनुषंगाने आपल्या देशाच्या तीनही सशस्त्रदलांच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुक्रवार, ९ मे या दिवशी राज्यभरातील सर्व मशिदींमध्ये विशेष प्रार्थना करावी, असे निर्देश मंत्री जमीर अहमद खान यांनी वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत.

संपादकीय भूमिका

मशिदींमधून सशस्त्रदलांसाठी विशेष प्रार्थना करण्यास सांगणार्‍या काँग्रेसच्या मंत्र्यांनी मशिदींमधून चालणार्‍या भारतविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया रोखण्यासाठीही प्रयत्न करावेत !