
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तानच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यामुळे मेरठ येथील झैद याला पोलिसांनी अटक केली आहे. सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या मयूर नावाच्या केशकर्तनालयामध्ये तो काम करतो. त्याने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘पाकिस्तान सही है’ यांसारख्या प्रक्षोभक आणि पाकिस्तानच्या बाजूने टिपण्या करणारी पोस्ट इन्स्टाग्रामरून प्रसारित केली होती.
१. झैद याने केलेल्या पोस्टचे पाकिस्तानमधून अनेकांनी समर्थन केले. या पोस्टविषयी स्थानिक हिंदु समुदायात तीव्र संताप होता. स्थानिक नगरसेवकाला या पोस्टविषयी माहिती मिळाल्यावर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली.
२. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत झैदला अटक केली.
३. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईनंतर सामाजिक माध्यमांवरील अनेक खात्यांवर पोलिसांकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.
४. लोकांनी केवळ अधिकृत स्रोतांकडून मिळालेली माहितीप्रसारित करण्याचे आणि अनावश्यक अफवा आणि आक्षेपार्ह मजकुरापासून अंतर राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपादकीय भूमिकाभारताने केवळ पाकमध्ये ‘स्ट्राईक’ करणे पुरेसे नसून भारतात असलेल्या पाकप्रेमींवरही ‘स्ट्राईक’ करून त्यांना अद्दल घडवणे आवश्यक ! |
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक