आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन !

पुणे – ‘उठ हिंदू जागा हो, हिंदुत्वाचा धागा हो’… ‘बंगाल की दंगाईओ से हम लढेंगे हम लढेंगे…..’, ‘पुरा भारत क्या चाहता है, बदला..बदला.. बदला…’ अशा घोषणा देत विश्व हिंदु परिषद, बजरंग दल पुणे महानगर यांच्या वतीने ‘बदला घ्या आंदोलन’ डेक्कन गुडलक चौक येथे काश्मीरध्ये हिंदूंवर झालेल्या क्रूर आक्रमणाच्या विरोधात करण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय मंत्री दादा वेदक, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, प्रांत संयोजक नितीन महाजन, प्रांत संयोजिका प्रिया रसाळ आदी उपस्थित होते.
किशोर चव्हाण पुढे म्हणाले की, देशाला पाकिस्तानसह त्याच्या आतील गद्दारांकडूनही धोका आहे. कोंढवा भागातील अनधिकृत बांगलादेशी नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल आंदोलन करतील. फर्ग्युसन कॉलेज रस्ता या परिसरात रात्री ९ नंतर चालणारे अनधिकृत व्यवसाय पोलीस प्रशासनाने त्वरित बंद करावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस ते स्वत:हून का बंद करत नाहीत ? – संपादक)
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
संपादकीय : मनसुबे उघड !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)