आक्रमणकर्त्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ, गोरक्षक आणि साधू-संतांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन
मोठे वाघोदा (जळगाव) – अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक करणार्या वाहनाला अडवण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली, तसेच त्यांना मारहाणही झाली. याप्रकरणी गोरक्षक, तसेच वाघोदा, सावदा, चिनावल येथील ग्रामस्थांनी आक्रमणकर्त्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील वाघोदा येथे २ घंटे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यामुळे वाहतूक ठप्प झाली. या प्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
या वेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पवन दासजी महाराज, ह.भ.प. धनराज महाराज, अंजाळेकर विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा महामंत्री योगेश भंगाळे, पंकज नारखेडे, राहुल पाटील, संजय माळी, मनीष भंगाळे, योगेश बोरोले, सुरेंद्र न्हावी, स्वप्नील पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ‘हा प्रकार १ महिन्याच्या आत बंद न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी जनार्दन हरी महाराज यांनी दिली. (साधू-संतांवर आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी ! – संपादक)
पोलीस पाटील गणेश भोसले यांना समाजकंटकांकडून मारहाण !वाद सोडवण्यासाठी गेलेले वाघोदा येथील पोलीस पाटील गणेश भोसले यांना समाजकंटकांनी मारहाण केली आणि त्यांच्या जवळील वस्तू बलपूर्वक काढून घेतल्या. (अशा समाजकंटकांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक) या प्रकरणी चौघांना कह्यात घेतले आहे. |
अवैध गोतस्करीसाठीचे वाहन बनावट असल्याचे उघड !
ज्या गाडीतून अवैध गोतस्करी करण्यात येत होती, तिच्या क्रमांकावरून शोध घेतला असता ती गाडीही बनावट असून तो क्रमांक एका दुचाकीच असल्याचे उघड झाले.