शिवाचे वाहन : नंदी

वृषभरूपातील नंदी हे शिवाचे वाहन असून त्याला शिवपरिवारात महत्त्वाचे स्थान दिले आहे. शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते.

नंदीची वैशिष्ट्ये

अ.‘सायणाचार्यांनी वृषभ या शब्दाचे व्युत्पादन वृष् धातूपासून केले असून त्याचा अर्थ वर्षिता (वर्षाव करणारा) असा दिला आहे. वृष् धातूपासून बनलेल्या वृषभ या शब्दाचा दुसरा अर्थ अत्यधिक प्रजननशक्तीने युक्त असा आहे.’ म्हणूनच नंदी हा विकसित पौरुषाचे लक्षण मानला गेला आहे.

आ. ज्याप्रमाणे धर्मशास्त्राचा प्रणेता मनु आणि अर्थशास्त्राचा बृहस्पति आहे, त्याप्रमाणे कामशास्त्राचा प्रणेता नंदी आहे.