४० वर्षांपासून अवैधरित्या मांसविक्री चालू विनाअनुमती प्रवासी रिक्शातून म्हशीच्या मांसाची वाहतूक
उरण (जिल्हा रायगड) – देवनार येथील पशूवधगृहातून उरण येथे विनाअनुमती रिक्शाने १२० किलो गोवंशियांचे मांस मागवणार्या कासम भाट येथील नफिसा अन्सारी या महिलेला पकडण्यात आले आहे. मांस वाहतुकीचा कोणताही परवाना नसतांना ते आणून देणारा रिक्शाचालक अफझलखान यालाही कह्यात घेण्यात आले आहे. या धर्मांध महिलेने ‘मी गेल्या ४० वर्षांपासून भरवस्तीमधून घरातूनच हा मांसविक्रीचा व्यवसाय विनाअनुमती करत आहे’, असे सांगितले. (गेली ४० वर्षे हा प्रकार चालू आहे, तर पोलीस प्रशासन काय झोपा काढत होते का ? अशा कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! विनाअनुमती मांसविक्री आणि मांसवाहतूक करणार्या सर्वांवरच कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
या मांसाची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी ते प्रयोगशाळेत पाठवले आहे. मांसाची अवैध वाहतूक करणारी रिक्शा जप्त करण्यात आली आहे. या वेळी धर्मांध महिलेने पोलिसांना विचारले, ‘‘प्रत्येक वेळी कारवाई होत नाही ? मग आताच कारवाई का करत आहात ? हे म्हशीचे मांस आहे. तुमच्या कारवाईमुळे माझे मांस विकले न गेल्यास याचे उत्तरदायित्व कोण घेणार ?’’ (पोलिसांचीच उलटतपासणी घेण्याचे धाडस दाखवणार्या धर्मांधांचा बेदरकारपणा यातून दिसून येतो ! पोलिसांचा धाक संपल्याचेच हे लक्षण आहे. – संपादक)
गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे प्रसंग उघड !गोरक्षक सिद्धेश शिंदे यांना हे मांस येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही संशयास्पद रिक्शा दिसल्यावर त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी ती थांबवली अन् चौकशी केल्यावर त्यात म्हशीचे मांस असल्याचे दोघांनी सांगितले. त्यांच्याकडे पावती मागितली असता पावती मुंबई उपनगराची होती; मात्र मांस उरणला आणलेले होते. रिक्शाचा क्रमांक आणि पावतीवरील गाडीचा क्रमांक जुळला नाही. तोही वेगवेगळा होता. मांस जेव्हा कायदेशीर पद्धतीने येते, तेव्हा त्यावर विकत घेणार्याच्या नावे परवाना (लायसन्स) क्रमांक असतो; मात्र तो येथे नव्हता. कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसतांना सर्वच व्यवहार संशयास्पद असून सर्वांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी तक्रार उरण पोलीस ठाण्यात गोरक्षक सिद्धेश शिंदे यांनी केली आहे. नागरिकांना अशा अवैध धंद्यांवर, तसेच अवैध घुसखोरीविरुद्ध कठोर पावले उचलण्याविषयी सुचवले आहे. (अशा गुन्हेगारांना कह्यात घेणे हे पोलिसांचे काम आहे; मात्र ते हप्ते घेण्यात गुंतलेले असल्याने गोरक्षकांना आपला जीव धोक्यात घालून हे काम करावे लागते. गोरक्षक सिद्धेश शिंदे आणि त्यांच्या सहकारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! – संपादक) |