सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार !
सातारा, २ फेब्रुवारी (वार्ता.) – सध्या संपूर्ण देशामध्ये धर्मांधतेचे वातावरण पसरवण्याचे काम सत्ताधार्यांकडून जाणीवपूर्वक केले जात आहे. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन सहस्रो भाविक मृत्यूमुखी पडले असावेत. तेथील शासन खरा आकडा घोषित करत नाही. याविषयी शासन आणि प्रशासन यांचा निष्काळजीपणा दिसून येतो. या प्रकरणाचे उत्तरदायित्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केली.
सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीमध्ये ते बोलत होते. (मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांची संख्या सहस्रोंच्या घरात असल्याचे कुठेही वृत्त आलेले नाही, असे असतांना बाबा आढाव धादांत खोटी आकडेवारी सांगत आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिका :कुंभमेळ्यातील खेदजनक घटनेविषयी पंतप्रधानांच्या त्यागपत्राची मागणी करणे हा निवळ हिंदुद्वेषच होय ! |