संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार ! – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई – महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसृष्टी उभारण्याच्या संदर्भात विधान परिषदेत चर्चा चालू असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरदेसाई वाड्याच्या संदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सरदेसाई वाड्यात भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली. छत्रपती संभाजी महाराजांची कैद याच वाड्यात झाली होती. ‘छावा’ चित्रपटात हे दृष्य दाखवण्यात आल्यानंतर अनेक शिवप्रेमींना संगमेश्वरमधील सरदेसाई वाडा खुणावू लागला; मात्र या ठिकाणी दुरवस्था झाल्यामुळे शिवप्रेमी अस्वस्थ होत होते. त्याची नोंद आता सरकारने घेतली आहे. स्मारकासाठी सरदेसाई वाडा अधिग्रहित करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले आहे.