पुणे – बहुळ (ता. खेड) येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दांपत्याच्या घरी मध्यरात्री ६ दरोडेखोरांनी चाकू आणि सुरी यांचा धाक दाखवून लूटमार केली होती. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी कोयत्याने जीवघेणे आक्रमण केले. त्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड घायाळ झाले. (पोलीस दरोडेखोरांना पकडतांना आवश्यक ती सतर्कता बाळगत नाही का ? कि त्यांचे प्रशिक्षण अपुरे असते ? – संपादक)