संतांच्या अस्तित्वामुळे स्वयंसूचना सत्रे करणे सुलभ होणे

‘१४.१.२०२४ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ शिकण्यासाठी आले. स्वयंपाकघरात सेवा करतांना ही प्रक्रिया शिकणार्‍या साधकांना प्रत्येक घंट्याला स्वयंसूचनासत्रे करण्यासाठी वेळ देतात. स्वयंसूचनासत्रे करण्यासाठी मी स्वयंपाक घराच्या मागे असलेल्या मार्गिकेत बसायचे. ती जागा सोडून अन्यत्र बसल्यास तेथे सत्रे व्यवस्थित न होणे, सत्र करतांना मन एकाग्र न होणे इत्यादी त्रास व्हायचे; मात्र त्या मार्गिकेत सत्रे चांगली होत. ‘असे का होते ?’, असा विचार माझ्या मनात बर्‍याच वेळा यायचा. नंतर मी देवाला प्रार्थना केल्यावर त्याने सुचवले, ‘या मार्गिकेत बसून पू. रेखाताई (सनातन संस्थेच्या ६० व्या समष्टी संत पू. रेखा काणकोणकर, वय ४७ वर्षे) स्वयंपाकघराचे दायित्व पहातात.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचा आढावा घेणार्‍या सौ. सुप्रिया माथूरताई (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४२ वर्षे) देखील याच मार्गिकेत बसून विविध सेवांविषयी पू. रेखाताईंशी चर्चा करतात. त्यांच्या तिथल्या अखंड अस्तित्वाने ती मार्गिका चैतन्यदायी झाली आहे. त्यामुळेच तिथे स्वयंसूचनासत्रे एकाग्रतेने होतात.’ देवाने मला संत सहवासात ठेवले, यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. कल्पना थोरात (वय ५७ वर्षे), सांगली (२१.४.२०२४)