आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे आवाहन

गौहत्ती (आसाम) – मी रकीबुल हुसैन यांना सांगू इच्छितो की, गोमांसावर बंदी घातली पाहिजे; कारण त्यांनी स्वतःच ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ते केवळ मला लिखित स्वरूपात देणे आवश्यक आहे, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसचे खासदार रकीबुल हुसैन यांनी केले. गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या दिप्लू रंजन सरमा यांनी काँग्रेस खासदार रकीबुल यांचा मुलगा तंजील यांचा २४ सहस्र ५०१ मतांनी पराभव केला होता. यानंतर खासदार रकीबुल हुसैन यांनी भाजपवर काँग्रेसच्या पराभवानंतर गोमांस वाटल्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री सरमा यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, दु:खाच्या वेळी रकीबुल हुसैन यांनी एक चांगली गोष्ट सांगितली की, गोमांस खाणे चुकीचे आहे, नाही का ? विरोधी पक्षाने हे सूत्र उपस्थित केल्याने मला आनंद झाला आहे. गोमांस वाटणे चुकीचे असल्याचे स्वतः काँग्रेस खासदारांचे मत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बुपेन कुमार बोरा यांनी मला पत्र लिहून मागणी केली, तर मी गोमांसावर बंदी घालण्यासाठी सिद्ध आहे.
आसाममधील कायदा काय सांगतो ?
‘आसाम कॅटल प्रिझर्वेशन अॅक्ट २०२१’नुसार आसाममध्ये गोमांस खाणे बेकायदेशीर नाही; परंतु ज्या भागात हिंदु, जैन आणि शीख बहुसंख्य आहेत आणि कोणत्याही मंदिर किंवा वैष्णव मठ परिसरात गोवंश हत्या आणि गोमांस विक्री यांवर बंदी आहे.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण