मुंबईत विनापरवाना पिस्‍तुले आणि जिवंत काडतुसे यांची विक्री करणार्‍या तिघांना अटक !

मुंबई – पायधुनी येथील पी. डीमेलो मार्गावरील प्रभु हॉटेल समोरच्‍या गल्लीतून विनापरवाना आणि अनधिकृतरित्‍या पिस्‍तुले अन् जिवंत काडतुसे यांची विक्री करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्‍यांच्‍याकडून २ पिस्‍तुले, १ रिव्‍हॉल्‍वर, ३ गावठी बनावटीचे सिंगल बोअर कट्टे, २ रिकाम्‍या मॅगझीन आणि एकूण ६७ जिवंत काडतुसे जप्‍त केली. या प्रकरणी अभिषेककुमार पटेल, सिद्धार्थ सुबोधकुमार सुमन उपाख्‍य गोलू, रचित रामशिषकुमार मंडल उपाख्‍य पुष्‍पक यांना पकडले. या प्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

अशांवर कठोर कारवाई व्‍हायला हवी ! त्‍यांना पिस्‍तुले आणि काडतुसे पुरवणार्‍यांचाही शोध घेऊन त्‍यांच्‍यावरही कारवाई करावी !