‘मी साधना चालू केल्यापासून १२ वर्षांनंतर प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला प्रथमच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याची संधी मिळाली. ‘स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांचे छायाचित्र आणि भगवान श्रीकृष्णाचे चित्र यांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ?’, हे अनुभवण्यास सांगितल्यानंतर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. मला प.पू. बाबांच्या छायाचित्रात सजीवता जाणवली. मी पुढे किंवा मागे सरकलो, तरी ‘प.पू. बाबा माझ्याकडेच बघत आहेत’, असे मला जाणवत होते.
२. भगवान श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर आलेल्या अनुभूती
अ. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर ‘त्याच्या हातातील सुदर्शनचक्र सर्वत्र फिरत आहे आणि येणार्या आपत्काळात श्रीकृष्ण सुदर्शनचक्राच्या साहाय्याने सर्व साधकांचे रक्षण करणार आहे’, असे मला जाणवले.
आ. ‘श्रीकृष्ण माझ्याकडे पाहून मला आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले.
गुरुचरणी कृतज्ञता !’
– श्री. उमेश किचंबरे, कळंबोली, जिल्हा रायगड. (वय ५१ वर्षे) (२.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |