श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील भक्तीसत्संग ऐकल्यावर थकवा दूर होऊन उत्साह वाटू लागणे

सौ. प्रीती जाखोटिया

‘एकदा मी शारीरिक सेवा केल्यानंतर मला पुष्कळ थकल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी विश्रांती घेतली; परंतु विश्रांती घेऊनही मला बरे वाटत नव्हते. माझे मन अस्वस्थ होते. त्या दिवशी गुरुवार असल्याने मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेला भक्तीसत्संग ऐकला. त्यांचा आवाज ऐकतांना माझ्या मनाला पुष्कळ ऊर्जा मिळत होती. तहानलेला जीव पाणी पिल्यावर जसा तृप्त होतो, अगदी तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मधुर वाणीने माझे मन तृप्त होत होते. भक्तीसत्संग ऐकून झाल्यावर माझ्या मनाला आलेला थकवा दूर होऊन मला उत्साह वाटू लागला.’

– सौ. प्रीती आनंद जाखोटिया, फोंडा, गोवा. (१९.८.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक