सकारात्मक वृत्तीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मृण्मयी कोथमिरे !

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेनिमित्त आले आहे. मी आणि कु. मृण्मयी कोथमिरे आश्रमातील एका खोलीत रहातो. माझ्या लक्षात आलेली मृण्मयीची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. मृण्मयी कोथमिरे
सुश्री (कु.) प्रणिता सुखठणकर

१. समंजस

मृण्मयी माझ्यापेक्षा वयाने बरीच लहान आहे. मी तिच्या खोलीत रहायला आल्यापासून ती प्रतिदिन माझ्याशी स्वतःहून बोलते. त्यामुळे मला त्या खोलीत रहायला चांगले वाटते.

२. प्रेमभाव

एकदा ती देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात काही दिवस गेली होती. तेथून गोव्याला येतांना तिने माझ्यासाठी खाऊ आणला.

३. इतरांचा विचार करणे

अ. एकदा मृण्मयीला रात्री सर्दीचा त्रास होत होता. तेव्हा ‘खोलीतील अन्य साधिकांची झोपमोड होऊ नये’, यासाठी तिने दुसर्‍या खोलीत जाऊन वाफ घेतली.

आ. एकदा एक नवीन आणि मृण्मयीपेक्षा वयाने लहान साधिका आश्रमात रहायला आली होती. ती आरंभी थोडी घाबरली होती. तेव्हा मृण्मयीने लगेच तिच्याशी जवळीक साधली आणि तिला धीर दिला.

४. इतरांना साहाय्य करणे

मृण्मयी आम्हाला (मला, तिच्या आईला (सौ. वैशाली कोथमिरे यांना) आणि तिच्या मावशीला (सौ. संस्कृती सागवेकर यांना) आमच्या आवश्यकतेनुसार साहाय्य करते. ती तिच्या सेवेशी संबंधित साधकांनाही साहाय्य करते.

५. ती नेहमी सकारात्मक आणि साधनेच्या दृष्टीने विचार करते.

‘मृण्मयीमधील गुण माझ्यामध्ये येऊ देत’, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे.’

– सुश्री (कु.) प्रणिता सुखठणकर, कोची, केरळ. (८.१०.२०२४)