‘अन्न जिहाद !’ 

घरच्या घरी किंवा अगदी कुठेही बसल्या जागी आवडीचा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली की, अनेक मंडळींचे हात आपोआपच ‘स्विगी’, ‘झोमॅटो’ या आणि अशा ऑनलाईन ‘ॲप्स’कडे वळतात. येथे एकाच ठिकाणी आपल्याला हवा तो पदार्थ आवडीच्या हॉटेलमधून मागवता येतो. कोणताही खाद्यपदार्थ सिद्ध केल्यापासून तो ग्राहकांपर्यंत पोचवण्यापर्यंत त्याची कशा पद्धतीने विटंबना केली जाते, याची अनेक उदाहरणे आतापर्यंत माध्यमांद्वारे प्रसारित झाली आहेत. गेल्या काही वर्षांत ‘थूंक जिहाद’, म्हणजेच काही धर्मांध खाद्यपदार्थ बनवतांना अथवा भाजी-फळे यांवर थुंकत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. आता अशाच प्रकारचा एक किळसवाणा प्रकार एका ‘व्हिडिओ’तून प्रसारित झाला आहे. एका बेकरीचा मालक तेथील कचरा काढत आहे. बेकरीतील खाद्यपदार्थ बंद काचेत ठेवलेले असले, तरी दुकानदार गोळा केलेल्या कचर्‍यातील काही भाग त्या खाद्यपदार्थांवर टाकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. केरळ येथील शबरीमाला मंदिरात येणार्‍या यात्रेकरूंना शौचालयाच्या पाण्यात बनवलेले खाद्यपदार्थ देणार्‍या अब्दुल शमीम याला रंगेहात पकडल्याचे ‘अय्यप्पा सेवा संघा’ने सांगितले आहे. अब्दुल शमीम हा केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेचा नेता आहे.

एका आस्थापनात सामोसे पुरवण्याचे काम दुसर्‍या कंत्राटदाराला मिळाल्याने पहिल्या कंत्राटदाराने षड्यंत्र रचून स्वत:कडील काही कामगार दुसर्‍या कंत्राटदाराकडे कामाला पाठवले. त्यांच्या माध्यमातून आस्थापनाला पुरवण्यात येणार्‍या समोसामध्ये विमल पानमसाला आणि दगड टाकल्याचे निषधार्ह कृत्य केले. हा प्रकार चिखली येथे उघडकीस आला होता. या प्रकरणी फिरोज शेख यांच्यासह ४ धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. वडोदरा (गुजरात) येथील प्रसिद्ध ‘हुसैनी समोसावाला’ या दुकानावर पोलिसांनी धाड घालून ६ धर्मांधांना अटक केली होती. या दुकानातून गोमांस भरलेले सामोसे विकण्यात येत होते. पोलिसांनी दुकानातून सामोसे बनवण्याच्या साहित्यासह १०० किलो गोमांसाचा साठा जप्त केला.

मध्यंतरी डोंबिवलीमध्ये लघवी लावून फळे विकणार्‍या धर्मांध फळवाल्याला पकडण्यात आले. कुणी स्वयंपाक करणारे धर्मांध अन्नात चक्क लघवी मिसळत असल्याचे पुढे आले. घरातील लोकांना मोठे आजार झाल्यावर त्यांनी घरात सीसीटीव्ही लावल्यावर ही गोष्ट पुढे आली. लंडनमध्ये एका उपाहारगृहात तर चक्क अन्नात जाणूनबुजून मानवी विष्ठा मिसळली जात असल्याचे उघड झाले.

इतरांच्या आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा हा ‘अन्न जिहाद’ न थांबणारा आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे अशा विकृतांकडील पदार्थ खायचे का ?, ते आता जनतेनेच ठरवावे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव