अमेरिका आणि पश्चिमी देश यांचे ढोंगी धोरण !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

एकीकडे अमेरिका आणि पश्चिमी देश हे ‘भारताने युक्रेनची बाजू घ्यावी, रशियाकडून तेल घेणे थांबवावे’, म्हणून दबाव टाकतात. दुसरीकडे भारत-कॅनडा यांच्या संघर्षात कॅनडाची बाजू उचलून धरतात. या वसाहतवादी मानसिकतेच्या देशांचे नेहमीच असे ढोंगी धोरण राहिले आहे. २१ वे शतक आशियाचे आहे. हे देश भारतावर दबाव आणू शकत नाहीत. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या तिन्ही देशांना भारताविना पर्याय नाही. यांच्या दबावाला केराची टोपली दाखवत आपण रशियाकडून तेल आयात करत आहोत. अमेरिका आणि युरोपियन देश यांनी रशियावर टाकलेल्या आर्थिक निर्बंधांचा पोपट झाला; कारण भारत अन् चीन यांचे आर्थिक समर्थन रशियाला आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.