Udhayanidhi Stalin On Tamil Names : स्वतःच्या मुलांची नावे तमिळ भाषेत ठेवा ! – तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्र्यांचा पालकांना फुकाचा सल्ला

उदयनिधी स्‍टॅलिन

चेन्नई – तमिळनाडूतील नवदांपत्यांनी त्यांच्या मुलांची नावे तमिळ भाषेत ठेवावीत, असा सल्ला तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी दिला. यासह तमिळ भाषेवर हिंदी भाषा लदू नका, अशी चेतावणीही त्यांनी केंद्र सरकारला दिली.

एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की,

१. केंद्र सरकार नव्या शैक्षणिक धोरणानुसार देशात हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदीचे अतिक्रमण तामिळनाडू कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांची नावे तमिळ भाषेत ठेवली पाहिजेत.

२. तमिळवर हिंदी भाषा थेट लादता येत नसल्याने केंद्र सरकार तमिळी राज्यगीतातील ‘द्रविडम्’ हा शब्द वगळण्याचा प्रयत्न करत आहे. तामिळनाडू राज्याचे नाव पालटण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला आहे. संपूर्ण राज्याने याला विरोध केल्याने असे करणार्‍यांना क्षमा मागावी लागली होती.

३. द्रमुक पक्षाचा शेवटचा वारस जिवंत असेपर्यंत तमिळ भाषा जिवंत राहील. तमिळ, तमिळनाडू आणि द्रविडम् यांना कुणीही स्पर्श करू शकणार नाही.

संपादकीय भूमिका

उपमुख्यमंत्री उदयनिधी यांचे वडील आणि राज्याचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे नाव तत्कालीन सोव्हिएत रशियाचा हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन याच्या नावावरून ठेवल्याचा उल्लेख आहे. स्वभाषेचा अभिमान बाळगण्याविषयी इतरांना सल्ला देण्याआधी उदयनिधी यांनी त्यांच्या वडिलांना दिलेले एका हुकूमशहाचे परकीय भाषेतील नाव त्यांना चालते का ?, हेही त्यांच्या तमिळी जनतेला सांगावे !