जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी यापूर्वी काढलेले उद्गार !

आज जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ५८ वा जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने…

जगद़्‍गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ५८ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नाणीज (जिल्हा रत्नागिरी) येथे आज २१ ऑक्टोबर २०२४ या दिवशी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ५८ वा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. त्या निमित्ताने ‘ऑक्टोबर २००१ मध्ये (‘नरेंद्र गाथा’, ऑक्टोबर २००१) या मासिकात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शुभेच्छा देणारे लिखाण  छापले होते,’ आमच्या वाचकांच्या माहितीसाठी हे शुभेच्छापत्र पुनर्प्रकाशित करत आहोत.

सनातन संस्था
सद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या ३६ व्या जन्मदिनाप्रीत्यर्थ (‘नरेंद्र गाथा’, ऑक्टोबर २००१) या मासिकात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शुभेच्छा देणारे लिखाण

‘प.पू. नरेंद्र महाराज यांनी समाजाच्या सर्व थरांतील लोकांना उपदेश करून त्यांना अध्यात्ममार्गाची दिशा दिली आहे. त्यांनी दाखविलेल्या दिशेने वाटचाल करणार्‍या अनेकांचे जीवन सुकर बनले आहे. त्यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पसरलेला संप्रदाय ‘त्यांचे समाजाला अध्यात्माची दिशा दाखविण्याचे कार्य किती सर्वदूर पसरले आहे’, याची प्रचीती देतो. समाजाभिमुखता हे त्यांच्या संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प.पू. महाराज यांचे कार्य वाढत जाणे, ही समाजाची आवश्यकता (गरज) आहे. सद्गुरुकृपेने हे होईल, यात शंकाच नाही ! प.पू. नरेंद्र महाराजांना ३६ व्या जन्मदिनाप्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा !’

आपला,

डॉ. जयंत बाळाजी आठवले