‘मी मागील १५ वर्षांपासून सौ. अवनी लुकतुके यांना ओळखते. विवाह झाल्यावर त्या साधना करू लागल्या. १६.१०.२०२४ (कोजागरी पौर्णिमा) या दिवशी सौ. अवनी लुकतुके यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. अवनी श्रीराम लुकतुके यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभेच्छा !
१. परिस्थिती स्वीकारणे
मागील १० वर्षांपासून सौ. अवनी आणि त्यांचा मुलगा कु. राघव (आध्यात्मिक पातळी ५२ टक्के, वय १५ वर्षे) कोची येथील सेवाकेंद्रात रहात आहेत. त्यांचे यजमान श्री. श्रीराम लुकतुके (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४३ वर्षे) हे मथुरा येथील सेवाकेंद्रात असतात. ‘आम्हाला यजमानांच्या समवेत रहायचे आहे’, अशी इच्छा सौ. अवनीनी कधी दर्शवली नाही. त्या जेथे रहातात, तेथील सर्व परिस्थिती स्वीकारून आनंदाने रहातात.
२. एखादा प्रसंग घडल्यावर त्या त्याविषयी मनात काहीच ठेवत नाही. स्वतः न्यूनपणा घेऊन त्या प्रसंग स्वीकारतात.
३. काटकसरी
सौ. अवनी आपले कपडे इत्यादी पुष्कळ जपून आणि काटकसरीपणे वापरतात.
४. अपेक्षा नसणे
यजमान सांगतील, त्याप्रमाणे अवनीताई सर्व करतात. या गोष्टीमुळे मला त्यांचे पुष्कळ कौतुक वाटते. ‘यजमानांनी काही विकत घेऊन द्यायला पाहिजे किंवा फिरायला न्यायला हवे’, असेही त्यांना कधी वाटत नाही.
५. कोणतीही सेवा अवनीताई व्यवस्थित आणि परिपूर्णरित्या करतात.
‘असे विविध गुण असलेल्या सौ. अवनीताई यांची जलद प्रगती होवो’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर, कोची, केरळ. (१५.८.२०२४)