परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या एका बोधवाक्‍याविषयी कल्‍याण येथील अधिवक्‍ता विवेक भावे यांनी श्री. राम होनप यांना विचारलेला प्रश्‍न आणि त्‍यावर त्‍यांनी दिलेले उत्तर !

श्री. राम होनप

प्रश्‍न : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये एकदा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे पुढील बोधवाक्‍य प्रसिद्ध झाले, ‘आपण देवाच्‍या नावे सर्व करतो, तसे देवही आपल्‍या नावे सर्व करतो’, या वाक्‍याचा अर्थ काय ?

उत्तर : साधक साधना करतांना टप्‍प्‍याटप्‍याने देवाला तन, मन आणि धन अर्पण करतो, तसे देव त्‍याच्‍याकडील ज्ञान, शक्‍ती, चैतन्‍य आणि आनंद हे टप्‍प्‍याटप्‍याने साधकाला देऊन परिपूर्ण करतो.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.