केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार अनावरण

पुणे – श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ४ जुलैला सकाळी १०.४५ वाजता होणार आहे. ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’च्या वतीने खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन्.डी.ए.) परिसरात हा ऐतिहासिक पुतळा उभारण्यात आला आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ‘सिटी ग्रुप’चे संचालक अनिरुद्ध देशपांडे, बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवे, तसेच एन्.डी.ए.चे कमांडंट ॲडमिरल गुरचरण सिंह हे उपस्थित रहाणार आहेत. अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आणि सचिव कुंदनकुमार साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !