व्याख्याते सुशील कुलकर्णी यांची मागणी

पुणे – ब्राह्मण महासंघाच्या वतीने ‘पेशवा का नकोत ?’ या विषयावर व्याख्याते सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानात बोलतांना ‘बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे विमानतळाला द्यावे’, अशी मागणी श्री. सुशील कुलकर्णी यांनी केली, तर ‘बाजीराव पेशवे’ यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार चालू करावा, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी मांडली. या कार्यक्रमात सचिन बोधनी, अभय ओरपे, गिरीश गुर्जर यांच्या नेतृत्वात १०० कार्यकर्त्यांनी ब्राह्मण महासंघात नुकताच प्रवेश केला होता. त्यांना पदांचे दायित्व या कार्यक्रमात देण्यात आले.
श्री. सुशील कुलकर्णी पुढे म्हणाले की, बाजीराव पेशवे यांची बाजू मांडतांना जातीचा उल्लेख महत्त्वाचा नसून कर्तृत्वाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. पानिपतच्या लढाईनंतर मराठी राज्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याची हिम्मत झाली नाही. लढाया जिंकण्याबरोबर धमे, धर्मरक्षण, धर्मस्थळे यांसाठी पेशव्यांनी उत्तम काम केले. केवळ मस्तानीसाठी पेशव्यांचा उल्लेख करणे योग्य नाही.
या वेळी श्री. आनंद दवे म्हणाले की, आपल्या संघटित प्रयत्नांतून दाता आणि शूर पिढी निर्माण केली पाहिजे. पेशवे, सावरकर, फडके यांचा इतिहास विशिष्ट जातीमुळे दुर्लक्षित केला जाऊ नये.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !