उज्जैन (मध्यप्रदेश) – काही दिवसांपूर्वी येथील एका परिसरात कचरा आणि भंगार वेचणार्या महिलेवर दिवसाढवळ्या पदपथावर बलात्कार करण्यात आला. ही घटना घडत असतांना त्या पदपथावरून ये-जा करणार्या लोकांनीही तिला वाचवले नाही, तर एका व्यक्तीने महिलेला वाचवण्याऐवजी बलात्काराचे चित्रीकरण करून हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. (बलात्कार होत असतांना त्याविषयी निष्क्रीय रहाणारा समाज नष्ट होण्याच्याच लायकीचा होय ! – संपादक) आता पोलिसांनी चित्रीकरण करणार्याला अटक केली आहे. महंमद सलीम (वय ४२ वर्षे) असे याचे नाव असून तो रिक्शाचालक आहे. (धर्मांधांनी मानसिकता जाणा ! – संपादक) त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
बलात्कार करणार्या व्यक्तीने त्या पीडित महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्या दिवशी त्याने महिलेला दारू पाजली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी यापूर्वी बलात्कार करणार्याला अटक केली असून त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही.
संपादकीय भूमिकादेशात प्रतिदिन लपूनछपून बलात्कार होत होते. आता उघड्यावर आणि दिवसाढवळ्या बलात्कार होत आहे. यावरून समाजाची स्थिती किती वाईट झाली आहे, हे लक्षात येते ! आतातरी सर्वपक्षीय सरकारे, प्रशासन, पोलीस आणि न्यायव्यवस्था जागे होऊन काही करतील का ? |

देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !
शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडणार्यांना लागणार ‘मकोका’ !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !