धर्मांधांच्या त्रासाला कंटाळून नाशिक येथील अल्पवयीन हिंदु मुलीची आत्महत्या !

लग्नासाठी मायलेकांचा पीडितेवर दबाव

नाशिक – ‘तू मला आवडतेस. तू माझ्याशी लग्न कर. मी तुझे लग्न कुठेही होऊ देणार नाही’, असे म्हणत कलाम मन्सुरी याने लग्नासाठी दबाव टाकला. २ वर्षे वारंवार पाठलाग करून त्याने आणि त्याच्या सहकार्‍यांनी छळ केला. या छळाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना

२३ ऑगस्ट या दिवशी देवळाली (नाशिक) येथे घडली. या प्रकरणी मृत मुलीच्या आईने नाशिक रस्ता पोलीस ठाण्यात त्रास देणार्‍या मन्सुरी याच्यासह १० जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

१. आरोपी मन्सुरी याने जानेवारी २०२२ पासून पाठलाग करून छळ करण्यास प्रारंभ केला. आरोपीची आई नाना खाला ही सुद्धा मुलीला ‘तुला पळवून आणीन’, अशी धमकी देत होती.

२. मन्सुरीचे साथीदार आरोपी जहांगीर शेख, बबलू शेख आणि मुन्ना शेख हेही ‘तू जर कलाम मन्सुरीसमवेत लग्न केले नाहीत, तर आम्ही तुला आणि तुझ्या घरच्यांना सोडणार नाही’, अशी धमकी देत होते.

३. मन्सुरीचे साथीदार आरोपी लादेन मन्सुरी, समीर शेख, नंदा मन्सुरी यांनीही कलामसमवेत लग्न करण्यासाठी मानसिक दबाव टाकला.

विश्व हिंदु परिषदेचे पूर्व जिल्हा (नाशिक) मंत्री विनोद थोरात म्हणाले, ‘‘हा विषय अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे. धमकावणे, छेडछाड करणे आणि मानसिक त्रास यांमुळे अल्पवयीन मुलींच्या जीवनावर किती वाईट परिणाम होऊ शकतात. यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन जागरुकता वाढवावी.’’

संपादकीय भूमिका 

  • धर्मांध त्यांचे कुटुंबीय आणि त्याचे साथीदार सर्वजण मिळून हिंदु मुलींवर दबाव आणत आहेत, हे संतापजनक आणि चिंताजनक आहे. हे प्रमाण वाढण्यापूर्वीच हिंदूंनी संघटित होऊन अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
  • मुलींनी धर्मांधांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यापेक्षा धर्मशिक्षण घेऊन साधना करून आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे. धर्मांधांना प्रतिकार करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणही घेणे अनिवार्य आहे !
  • सर्वत्रच्या हिंदूंसाठी डोकेदुखी ठरलेल्या धर्मांधांचा बंदोबस्त पोलीस प्रशासन करत नाहीत, हे लक्षात घ्या !