Divided Hindus Will Destroyed : आपण (हिंदू) विभागले गेलो, तर कापले जाऊ ! – योगी आदित्‍यनाथ

  • उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांचे महत्त्वपूर्ण वक्‍तव्‍य !

  • बांगलादेशातील लाखो हिंदू जन्‍माष्‍टमीचे व्रत करत असले, तरी त्‍यांच्‍या मुखावर आनंद नाही !

उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

मथुरा (उत्तरप्रदेश) – आपण (हिंदूंनी) एकसंध रहाण्‍याची आवश्‍यकता आहे; कारण जर आपण विभाजित झालो, तर आपण कापले जाऊ. आपले नष्‍ट होणे निश्‍चित आहे. आज श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी असून बांगलादेशातील लाखो हिंदू भीतीच्‍या छायेत आपल्‍या देवाची पूजा करत आहेत. ते व्रताचरण करत असले, तरी त्‍यांच्‍या मुखावर आनंद नाही. ‘बांगलादेशातील सत्तापालटानंतर तेथील हिंदूंना तेथील कट्टरतावाद्यांमुळे त्‍यांचे जगणेही कठीण होईल’, याची कल्‍पनाही नव्‍हती. ते सर्व काही नष्‍ट करून टाकतील, असे त्‍यांना वाटलेही नव्‍हते. जन्‍माष्‍टमीला बांगलादेशी हिंदूंच्‍या वेदना अधिक प्रमाणात उफाळून आल्‍या आहेत, असे महत्त्वपूर्ण वक्‍तव्‍य उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी केले. ते श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमीच्‍या मुहूर्तावर येथे आले होते.

मुख्‍यमंत्री पुढे म्‍हणाले की,

१. हिंदूंनो, जातीपातीत न अडकता एकत्र या !

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्‍याचार पहाता भारतातील हिंदूंमध्‍ये जातीपातीच्‍या आधारे फूट पडण्‍यापेक्षा त्‍यांनी एकत्र राहिले पाहिजे.

२. विरोधकांना बांगलादेशातील हिंदूंवरील अन्‍याय यामुळे दिसत नाही…!

बांगलादेशातील घटनांवर हे सर्वजण (विरोधक) मौन बाळगून आहेत, कारण ‘आपण बोललो, तर आपली व्‍होटबँक हातातून निसटेल !’, याची त्‍यांना भीती वाटते. त्‍यामुळे ते गप्‍प आहेत.

३. पॅलेस्‍टाईन दिसतो; परंतु बांगलादेश नाही !

जगाच्‍या इतर प्रश्‍नांवर बोलणार्‍यांना ‘पॅलेस्‍टाईन’ दिसतो, पण बांगलादेश दिसत नाही. ते जगातील इतर ठिकाणे पाहू शकतात, परंतु बांगलादेशात जे चालू आहे, ते पाहू शकत नाहीत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनो, यापेक्षा आणखी किती स्‍पष्‍ट शब्‍दांत महंत असलेल्‍या एका मुख्‍यमंत्र्यांनी तरी तुम्‍हाला सांगावे ? आतातरी जागृत व्‍हा आणि एक धर्मप्रेमी हिंदू बनून संघटित व्‍हा अन् हिंदु राष्‍ट्र स्‍थापा ! अन्‍यथा पाकिस्‍तान आणि बांगलादेश येथील हिंदूंसारखे मरायला सिद्ध व्‍हा !
  • किती हिंदुत्‍वनिष्‍ठ राजकीय नेते अशा प्रकारे हिंदूंच्‍या हितरक्षणासाठी सडेतोडपणे भूमिका घेतात ? त्‍यामुळेच हिंदूंना योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासारख्‍या नेत्‍यांचाच आधार वाटतो, हे जाणा !