नाशिक येथे ३०० जणांविरुद्धर गुन्हे नोंद ; २० हून अधिक समाजकंटकांना अटक

बंदच्या काळात दगडफेक झाल्याचे प्रकरण

नाशिक – येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदच्या काळात दुकाने बंद करण्यावरून दोन गटांत वाद झाला होता. त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. या प्रकरणी पोलिसांनी ३०० जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. २० हून अधिक समाजकंटकांना अटक करण्यात आली असून १०० पेक्षा अधिक जणांची ओळख पटली आहे. दंगलखोरांच्या अटकेचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि दंगल भडकावल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.