‘राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम’ – हिंदूंचे थडगे बांधण्याची नीती !
स्वातंत्र्योत्तर सत्तारूढ झालेल्या भारतातील हिंदुद्वेष्ट्या नेत्यांच्या लक्षात आले की, भारतातील हिंदु, बौद्ध, जैन आणि शीख यांची जोपर्यंत एकी आहे, तोपर्यंत या देशात आपल्याला हवे ते कायदे करून या देशाचे ख्रिस्ती अन् इस्लामीकरण करता येणार नाही. कोणत्याही देशावर जेव्हा अनिर्बंध आणि दीर्घकालीन सत्ता गाजवायची असते, तेव्हा तेथील लोकांत धर्म, पंथ, संप्रदाय, जातपात, भाषा, प्रांत यांवरून फूट पाडणे आवश्यक असते. देशातील जनतेत विविध कारणांवरून छोटे छोटे गट निर्माण करून, त्यांच्या अस्मितांना चेतवून त्यांची आपसात भांडणे लागली की, सत्ता टिकवणे सोपे जाते. हे ब्रिटिशांनी चांगलेच जाणले होते !
१. ब्रिटिशांनी भारतावर वैचारिक आक्रमणाच्या माध्यमातून राबवलेली ‘फोडा आणि झोडा’ (अ)नीती !
ब्रिटिशांनीही ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ याच सूत्राचा अवलंब करून भारतावर १५० वर्षे राज्य केले. भारतियांना मानसिकदृष्ट्या गुलाम केले. भारतातील साधनसंपत्तीचे अनिर्बंध शोषण करून भारताला दारिद्र्याच्या दरीत ढकलले. ब्रिटीश राज्यकर्त्यांनी काही ब्रिटीश विचारवंतांना हाताशी धरून त्यांना भरपूर मानधन दिले आणि त्यांच्याकरवी ‘आर्यांचा भारतावरील आक्रमणा’चा धादांत खोटा सिद्धांत प्रस्थापित केला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांमध्ये फूट पाडली. ‘आर्यांनी दक्षिणेतील द्रविड आणि येथील मूळ रहिवाशांवर आक्रमण करून त्यांची संस्कृती नष्ट केली’, अशा खोट्या इतिहासाचा प्रचार आणि प्रसार केला.
२. भारतीय संस्कृती रानटी असून इंग्रजी सभ्यता अंगीकारण्याविषयी जनतेच्या मनावर बिंबवणे
येथील जातीभेदरहित आणि प्रगल्भ अशा गुरुकुल शिक्षणपद्धतीचा नाश केला अन् भारतियांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनवणार्या मेकॉलेची शिक्षणपद्धत प्रस्थापित केली. येथील सर्व संपन्न आणि समृद्ध भाषांना मृतवत् करून इंग्रजी भाषेचे स्तोम माजवले. ‘येथील मूळ हिंदु संस्कृती आणि सभ्यता ही रानटी, मागास आणि प्रतिगामी असून इंग्रजांचीच सभ्यता अन् भाषा आधुनिक, पुरोगामी आहे, त्यांचा स्वीकार करण्यातच भारतीय जनतेचे हित आहे’, हे जनतेच्या मनात पक्के रुजवले. संस्थानिकांमध्ये, जातीजातींत फूट पाडून त्यांना आपसांत एकमेकांविरुद्ध लढवून त्यांचे स्थान पक्के केले. ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मांधतेला, कट्टरतेला प्रोत्साहन दिले. अखेर या देशाचे विभाजन करून इंग्रजांनी या देशातून काढता पाय घेतला.
३. स्वातंत्र्योत्तर सत्तारूढ हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी इंग्रजांचे ‘फोडा-झोडा’ धोरण अवलंबणे
स्वातंत्र्योत्तर सत्तारूढ झालेल्या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी ‘भारताची सत्ता एकहाती आपल्या हाती घेऊन दीर्घकाळ टिकावी, सत्तेच्या माध्यमातून मग हिंदूंचा नाश करता यावा’, यासाठी इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’, याच सूत्राचा अवलंब केला. त्यांनी विविध नवीन कायदे करून, पूर्वीच्या कायद्यांत पालट करून हिंदु, बौद्ध, जैन आणि शीख यांना एकमेकांपासून वेगळे केले. जातीजातींत भांडणे लावून दिली. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना हिंदूंपेक्षा अधिक अधिकार, संरक्षण अन् सोयीसवलती देऊन त्यांना या देशात हवे ते परिवर्तन घडवून आणण्याची मोकळीक आणि मुभा दिली.
४. बौद्ध, जैन आणि शीख हे हिंदु धर्माचेच पंथ !
वर्ष १९९२ पूर्वी हिंदु, बौद्ध, जैन आणि शीख यांना एकच शत्रू होता. या चारही धर्मपंथियांना ‘हिंदु’ अशीच ओळख होती. या चारही धर्म आणि पंथ यांचे निर्मितीस्थान हिंदुस्थानच होते. पूर्वी हिंदु म्हणून जन्मलेल्या भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि गुरुनानक यांनी अनुक्रमे बौद्ध, जैन अन् शीख या पंथांची स्थापना केली; म्हणून घटनाकार डॉ. आंबेडकर यांनीसुद्धा हिंदूंसाठी बनवलेल्या कायद्यांत बौद्ध, जैन आणि शीख यांचाही समावेश केला. हिंदु, बौद्ध आणि जैन यांच्यात अनेक साम्यस्थळे आहेत. शिकवणुकीतही फारसा फरक नाही. या तिघांच्या धार्मिक कथा आणि कथांमधील पात्रे यांतही बरेचसे साम्य आहे. शीख हा तर हिंदु धर्माचाच भाग आहे. हिंदु आणि हिंदु धर्म यांचे रक्षण करण्यासाठीच या क्षात्रवृत्तीच्या पंथाची निर्मिती झाली. पूर्वी हिंदु कुटुंबातील पहिला मुलगा शीख पंथाला दान केला जात असे. हिंदु आणि शीख यांमध्ये रोटी-बेटी व्यवहार पूर्वीपासून आजपर्यंत होत आहेत; पण पुढे ‘फोडा अन् झोडा’ या धोरणानुसार हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी शीख पंथाला हिंदूंपासून वेगळा आणि स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता दिली.
५. ‘राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियमा’द्वारे बौद्ध, जैन आणि शीख यांना हिंदूंपासून वेगळे करणे
पण एवढ्यावरही हिंदुद्वेष्ट्या नेत्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वर्ष १९९१ मध्ये ‘राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम’ (मायनॉरिटी कमिशन ॲक्ट) हा कायदा करून बौद्ध, जैन आणि शीख यांना हिंदूंपासून पूर्णतः वेगळे केले. मुसलमान, ख्रिस्ती आणि पारसी यांच्यासमवेत बौद्ध, जैन अन् शीख यांनाही धार्मिक, तसेच भाषिक अल्पसंख्यांकांचा दर्जा दिला. या कायद्याद्वारे वरील तथाकथित अल्पसंख्यांकांना पुढीलप्रमाणे अधिकार देण्यात आले.
अ. स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करणे (प्रोटेक्शन ऑफ एक्झिस्टन्स)
आ. भेदभाव आणि छळ यांपासून संरक्षण (प्रोटेक्शन ऑफ डिस्क्रिमिनेशन)
इ. स्वतःची वेगळी ओळख जपून त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संरक्षण (प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ आयडेंटीटी )
ई. देशातील राजकारणात भाग घेण्याचा अधिकार (पार्टिसिपेशन इन पॉलिटिकल लाईफ)
अल्पसंख्यांकांना असे अधिकार आणि संरक्षण देतांना म्हटले गेले की, देशातील बहुसंख्य (अर्थात् हिंदु) असलेल्या जनतेकडून अल्पसंख्यांकांवर दडपशाही (ॲग्रेशन) होऊ नये, म्हणून हा कायदा करण्यात आला आहे.
हा ‘राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम’ बनवून हिंदुद्वेष्ट्या आणि मुसलमान मतांसाठी लाचार असणार्या नेत्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. या कायद्याद्वारे त्यांनी बौद्ध, जैन, शीख यांना हिंदूंपासून वेगळे केले, तसेच मुसलमान, ख्रिस्ती आणि पारसी यांना स्वतःची वेगळी ओळख जपण्याचे स्वातंत्र्य अन् अधिकार देऊन त्यांना राष्ट्रीय प्रवाहापासून कायमचे दूर केले. या कायद्याच्या भाषेचा बारकाईने अभ्यास केला, तर स्पष्टपणे दिसून येते की, या देशातील हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना भारतातील जनतेमध्ये धर्म आणि जाती यांवरून फूट पाडून या देशातील बहुसंख्य हिंदूंचा पूर्णतः सर्वनाश करायचा आहे. वरील कायद्याद्वारे भारतातील तथाकथित अल्पसंख्यांकांना स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करण्याचा अधिकार देण्यात आला.
६. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना आश्रय देण्याची फळे
प्रश्न असा पडतो की, या कायद्यापूर्वी मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, जैन, शीख आणि पारसी यांचे अस्तित्व धोक्यात आले होते का ? हिंदूंनी या धर्मियांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी काय त्यांच्या कधी कत्तली केल्या होत्या ? उलट अत्यंत सहिष्णु असणार्या हिंदूंना मुसलमानांच्या अत्याचारापायी आपल्याच मातृभूमीतून विस्थापित व्हावे लागले. हिंदूंनी पारसी, यहुदी यांना उदारपणे आश्रय दिला. हिंदूंनी शक, कुशाण आणि हूण या आक्रमकांनाही आपल्या संस्कृतीत सामावून घेतले. मुसलमान आणि ख्रिस्ती यांनाही आश्रय दिला; पण त्यांना आश्रय देण्याच्या उदारपणाची फळे आता हिंदु समाज भोगत आहे. आता मुसलमानांच्या कट्टरतेमुळे, त्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि ख्रिस्ती करत असलेल्या धर्मांतरामुळे या देशातील हिंदूंचेच अस्तित्व धोक्यात आले आहे.
७. हिंदूंकडून बौद्ध, जैन, शीख आणि पारसी यांचा छळ हे एक मोठे षड्यंत्र !
या कायद्याद्वारे अल्पसंख्यांकांना भेदभाव आणि छळ यांपासून संरक्षण देण्यात आले. यातून त्या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना जणू हेच सुचवायचे होते की, भारतात बहुसंख्य असणार्या हिंदूंकडून बौद्ध, जैन, शीख, मुसलमान, ख्रिस्ती आणि पारसी या अल्पसंख्यांकांचा पुष्कळ छळ होतो. त्यांना भेदभावाची वागणूक दिली जाते. मुळात हिंदूंनी बौद्ध, जैन आणि शीख यांना कधीच परके मानले नाही. अगदी २ सहस्र वर्षांपूर्वीचा इतिहास पहातो म्हटले, तर या देशात अनेक हिंदु, बौद्ध, जैन आणि शीख राजे होऊन गेले; पण राजा यांपैकी कोणत्याही धर्माचा असो त्याने आपल्या राज्यातील इतर धर्मीय लोकांचा छळ केला, त्यांच्याशी भेदभावाची वागणूक केली, असे एकही उदाहरण सापडणार नाही. प्रत्येक धर्मियांना आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे, आपल्या धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचे, आपल्या धर्माची प्रार्थनास्थळे उभारण्याचे मुक्त स्वातंत्र्य होते. या चारही धर्मियांच्या आचरणात धार्मिक, आर्थिक, सामाजिक या विषयांमध्ये समरसता होती. नालंदा, तक्षशिला या प्रसिद्ध विश्वविद्यालयांखेरीज इतर अनेक विश्वविद्यालयांमध्ये हिंदु, बौद्ध आणि जैन या तीनही धर्मांचा अभ्यास शिकवणारे ब्राह्मण, भिक्खु अन् मुनी आचार्य होते. विश्वविद्यालयात सर्व धर्मीय विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जात होती. वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यात हिंदु, बौद्ध आणि जैन धर्मीय लेण्यांचा संगम दिसून येतो. भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे हिंदु, बौद्ध आणि जैन धर्मातील देवीदेवतांच्या एकत्रित प्रतिमा दिसून येतात. शीख धर्मियांविषयी काय बोलावे ? शीख हे हिंदूच असल्यामुळे त्यांच्या छळाचा प्रश्नच येतो कुठे ?
लक्षावधी हिंदू गुरुद्वारात ‘गुरुग्रंथसाहिबा’समोर माथा टेकवण्यासाठी, तर लाखो शीख हिंदु देवीदेवतांच्या मंदिरात नतमस्तक होण्यासाठी श्रद्धेने जात असतात. या देशातील पारसी समाज अत्यंत शांत आणि समंजस आहे. या समाजाने उद्योग आणि व्यवसाय यांनी या देशाला समृद्धी अन् जगात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे हिंदु समाजाने पारसी धर्मियांचा नेहमी सन्मान आणि आदरच केला आहे. या देशातील हिंदु, बौद्ध, जैन आणि शीख धर्मीय समाजात आपसात कधी दंगली झाल्या नाहीत; कारण या सर्वांची मातृभूमी एकच आहे. त्यामुळे हिंदु समाजाने पूर्वीही कधी बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांचा छळ केला नाही. त्यांना कधीही भेदभावाची वागणूक दिली नाही. आजही हिंदूंच्या या आचरणात कोणताही पालट झालेला नाही आणि भविष्यातही कोणता पालट होणार नाही. त्यामुळे ‘मायनॉरिटी ॲक्ट’मध्ये हिंदूंकडून बौद्ध, जैन, शीख आणि पारसी समाजाचा छळ होतो, त्यांना भेदभावाची वागणूक मिळते, हे केलेले गृहितक अत्यंत खोडसाळपणाचे, हिंदूंची अपकीर्ती करण्याचे अन् हिंदूंपासून बौद्ध, जैन, तसेच शीख यांना वेगळे करण्याचे हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी आखलेले एक षड्यंत्रच आहे, हे स्पष्ट होते. मुसलमान, ख्रिस्ती या तथाकथित अल्पसंख्यांकांविषयी काय बोलावे ? हिंदूंकडून त्यांचा छळ कधीच होत नाही. उलट त्यांच्यांकडून होणार्या छळांमुळे हिंदु समाज पूर्वीही त्रस्त होता आणि आजही त्रस्त आहे ! (क्रमश: पुढील रविवारी)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जिल्हा यवतमाळ.
संपादकीय भूमिकाहिंदूंची अपकीर्ती आणि हिंदूंपासून बौद्ध, जैन अन् शीख यांना वेगळे करण्याचे षड्यंत्र जाणून ‘अल्पसंख्यांक कायदा’ रहित करण्याची मागणी करा ! |