देशभक्त टॅक्सी चालक !

नवी देहली – अलीकडेच शहरातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी व्यक्ती आणि त्याची मैत्रिण यांना एका टॅक्सी चालक रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून फटकारतांना दिसत आहे. टॅक्सी चालकाने आरोप केला की, पाकिस्तानी व्यक्तीने भारताविषयी अवमानकारक भाषा वापरली होती आणि भारताला ‘संधीसाधू’ म्हटले होते. ‘माझ्या देशाचा कुणी अवमान केला, तर मी ते खपवून घेणार नाही’, असे टॅक्सी चालक म्हणत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. टॅक्सी चालकाच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी व्यक्तीने ‘देहलीत सज्जन नाहीत’, असे म्हटले होते.
पाकिस्तानी व्यक्तीच्या मैत्रिणीने टॅक्सी चालकाला प्रत्युत्तर देण्यास चालू केले आणि स्वतःच्या मित्राचा बचाव करतांना व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही वेळाने तिघांमधील वाद इतका वाढला की, टॅक्सी चालकाने आक्रमक भूमिका घेत दोघांनाही रस्त्यातच सोडले, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
संपादकीय : सरकारी शाळा बंद का पडतात ?