‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेनिमित्त गेले होते. तेव्हा मला परात्पर गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४२ वर्षे) यांच्या संदर्भात काढलेले कौतुकोद्गार येथे दिले आहेत.
त्या सत्संगात परात्पर गुरुदेवांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल काही क्षणांतच होते, त्याप्रमाणे पू. (सौ.) मनीषा साधकांना साधनेत आलेल्या अडचणी काही क्षणांत सोडवतात. साधकांनी त्यांच्या अडचणी पू. (सौ.) मनीषा यांना सांगायला हव्यात. साधकांनी पू. (सौ.) मनीषा यांचे साधनेत साहाय्य घ्यायला हवे.’’
परात्पर गुरुदेवांचे बोलणे ऐकून मला जाणीव झाली, ‘पुणे जिल्ह्यातील साधकांना पू. मनीषाताईंचा नियमित सत्संग मिळत आहे; मात्र मी त्यांचे साहाय्य घेण्यात न्यून पडत आहे.’
गुरुदेवांच्या मार्गदर्शनाच्या वेळी मला पुष्कळ अंतर्मुखता अनुभवता आली. त्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. सुलोचना कुंभार (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५४ वर्षे), पुणे
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |