|
गांधीनगर (गुजरात) – राजकोटमध्ये पूजेसाठीचे मंडप बांधणार्या हिंदु कुटुंबावर ४ धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. यात एक हिंदु गंभीररित्या घायाळ झाला.
येथे जगदीशभाई वाघेल हे मंडप बांधण्याचे काम करतात. त्यांचा मोठा मुलगा मिहिर आणि लहान मुलगा आशिष ‘फास्ट फुड’ विकण्याचे काम करतात. या घटनेविषयी मिहिर म्हणाला की, माझे वडील पूजेचा मंडप बांधण्यासाठी अशाबपीर दर्ग्याजवळ गेले होते. त्याठिकाणी मंडप बांधण्याचे काम चालू होते. त्या वेळी काही मुसलमानांनी वडिलांना तेथील रस्त्यावरून जाण्यापासून रोखले होते. वडील घरी आल्यानंतर त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा अचानक आमच्या घरी सिकंदर, अफझल, दरेद आणि समीर हे ४ भाऊ धारधार शस्त्रे घेऊन आले. त्यांनी आमच्यावर आक्रमण केले. तेव्हा आमच्या आई-वडिलांनी आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही मारण्यात आले. त्या वेळी माझा लहान भाऊ आशिषवर चाकूने वार करण्यात आले. त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आक्रमण करत असतांना ‘हे हिंदू आहेत. यांना असे मारा की, हे कधीच उठू नये, यांना घायाळ करा’, असे आक्रमणकर्ते म्हणत होते.
संपादकीय भूमिकागुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! |