Can Happen India too : (म्‍हणे) ‘बांगलादेशासारखी परिस्‍थिती भारतातही होऊ शकते !’ – सलमान खुर्शीद

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचे देशविरोधी विधान

नवी देहली – ‘जरी भारतात आता सर्वकाही सामान्‍य वाटत असले, तरी आपला देश इतका मोठा आहे की, बांगलादेशासारखी परिस्‍थिती भारतातही होऊ शकते. कारण सत्‍य हे आहे की, आत काहीतरी जळत आहे’, असे विधान काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी येथे एका पुस्‍तकाच्‍या प्रकाशनाच्‍या कार्यक्रमात बोलतांना केले.

सलमान खुर्शीद म्‍हणाले की, महिलांनी नागरिकत्‍व सुधारणा कायदा आणि राष्‍ट्रीय नागरिकत्‍व नोंदणी या कायद्यांच्‍या विरोधात देहलीतील शाहीन बाग येथे केलेल्‍या निदर्शनांनी देशभरात अशाच निषेधांना प्रेरणा दिली. शाहीन बागसारखी चळवळ आज देशात होऊ शकत नाही. ‘शाहीन बागचे आंदोलन यशस्‍वी झाले’, असे आपल्‍यापैकी अनेकांना वाटते; पण मला ठाऊक आहे की, शाहीन बागमध्‍ये आंदोलन करणार्‍या संबंधित लोकांचे काय होत आहे, त्‍यांपैकी किती जण अजूनही कारागृहात आहेत, किती जणांना जामीन मिळू शकलेला नाही आणि किती जणांना देशाचे शत्रू म्‍हटले जात आहे ! ‘शाहीन बागची पुनरावृत्ती होईल का ?’, असा प्रश्‍न मी स्‍वत:ला विचारला, तर मला खात्री नाही की, ते होईल; कारण लोकांना खरोखरच खूप त्रास सहन करावा लागला आहे.’

संपादकीय भूमिका

खुर्शीद आधी धर्मांध मुसलमान आहेत आणि नंतर काँग्रेसवाले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या तोंडून देशविरोधी विधान न निघाल्‍यासच आश्‍चर्य आहे. भारताला अशाच लोकांनी बुडवण्‍याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. बांगलादेशासारखी स्‍थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर अशांना देशद्रोहाच्‍या गुन्‍ह्याखाली कारागृहात डांबले पाहिजे !