‘विवाह कर, अन्यथा अश्लील छायाचित्रे प्रसारित करीन आणि तुझ्यावर आम्ल फेकीन’, अशा प्रकारे धमकी !
मैनपुरी (उत्तरप्रदेश) – येथे २९ जुलैला एका हिंदु तरुणीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. महंमद वसीफ अन्सारी नावाच्या लव्ह जिहाद्याने तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला होता. तिने तसे न केल्यास तिची अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली होती. तसेच तिच्यावर आम्ल फेकणार असल्याचेही त्याने धमकावून सांगितले होते. या छळाला कंटाळून तिने रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
१. ही तरुणी ‘बी.एस्.सी.’चे शिक्षण घेत होती, तर महंमद हा देहलीत वाहनचालकाचे काम करतो.
२. ३ ऑगस्टला मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर महंमदच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
३. मैनपुरीचे पोलीस आयुक्त विनोद कुमार यांनी ‘एक्स’वर सांगितले की, आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.
Love Jihad in Mainpuri (UP) : Frustrated of harrassment by one Wasif Ansari, Hindu girl commits suicide
She was threatened with her obscene pictures being circulated and an acid attack if she refused to marry.
Despite the anti-Love Ji#ad laws in Uttar Pradesh, such tragic… pic.twitter.com/WOMTlXDl2c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 6, 2024
पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत केलेले हृदयद्रावक कथन !
तक्रारीत मृत पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे की,
१. माझ्या मुलीने घरनाजपूर परिसरातील रहिवासी वसीफ अन्सारी याची कृत्ये आम्हाला सांगितली होती. केवळ अपकीर्तीच्या भीतीने मी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला नाही.
२. मी या प्रकरणाची तक्रार वसीफचे वडील अस्लम आणि भाऊ सलीम यांच्याकडे केली असता त्यांनी मलाच शिवीगाळ केली अन् सांगितले की वसीफचा विवाह माझ्या मुलीशीच होईल.
३. वासिफने माझ्या मुलीला धमकावल्यामुळेच तिने आत्महत्या केली.
संपादकीय भूमिका
|